-
जॉन स्टाइनबेक यांचे द लॉन्ग व्हॅली : स्टाइनबेक हे ‘द ग्रेप्स ऑफ रॅथ’ साठी प्रसिद्ध असले तरी, ‘द लॉन्ग व्हॅली’ हा त्यांनी लिहिलेला महामंदीच्या काळात कॅलिफोर्नियाच्या ग्रामीण भागाचं चित्रण करणारा एक मार्मिक लघुकथा संग्रह आहे. यातील प्रत्येक कथा मानवी नाजूकपणाला सॅलिनास व्हॅलीच्या सौंदर्याशी जोडते, ज्यामुळे स्टाइनबेक यांची दैनंदिन संघर्षांना वैश्विक सत्यात रूपांतरित करण्याची क्षमता दिसून येते.
-
व्हर्जिनिया वुल्फ लिखित ‘नाईट अँड डे’: ‘मिसेस डॅलोव्हे’ आणि ‘टू द लाईटहाऊस’ ही व्हर्जिनिया वुल्फ यांची जगभर नावाजलेली पुस्तकं आहेत. यासह त्यांची ‘नाईट अँड डे’ हीसुद्धा वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी कादंबरी आहे.
-
सिल्व्हिया पाथ लिखित क्रॉसिंग द वॉटर: द कोलोसस आणि एरियल यांच्यामुळे कमी ज्ञात असलेला सिल्व्हिया यांचा काव्यसंग्रह देखील एकदा वाचलाच पाहिजे.
-
डेव्हिड डेव्हिडर यांचे द हाऊस ऑफ ब्लू मँगोज: डेव्हिडर हे प्रकाशक म्हणून ओळखले जात असले तरी, त्यांची पहिली कादंबरी ही एका काल्पनिक दक्षिण भारतीय किनारी शहरात घडणारी एक कौटुंबिक गाथा आहे. ही कादंबरी तीन पिढ्यांपर्यंत पसरलेली, राजकीय उलथापालथी, वसाहतवादी बदल आणि सांस्कृतिक बदलांसह वैयक्तिक हेवेदावे आणि नात्यांमधील बंध विणते. ही कादंबरी जिव्हाळ्याच्या आणि महाकाव्यात्मक अशा जगाचे एक समृद्ध चित्र रंगवते.
-
अलर्ट कॅमूस यांचे द फॉल: ‘द स्ट्रेंजर ऑर द प्लेग’पेक्षा कमी चर्चेत असलेली ही तात्विक कादंबरी पूर्णपणे जीन-बॅप्टिस्ट क्लेमेन्स यांच्या एकपात्री प्रयोगाच्या रूपात उलगडते.
-
लिओ टॉल्स्टॉय लिखत रिसरेक्शन : टॉल्स्टॉय यांची अनेक गाजलेली पुस्तकं आणि कादंबऱ्यांमध्ये ‘रिसरेक्शन’कडे अनेकांचं लक्ष गेलं नाही. मात्र, ही टॉल्स्टॉय यांची शेवटची प्रमुख कादंबरी आहे. ज्यामध्ये वर्षानुवर्षे एका महिलेवर अन्याय केल्यानंतर मुक्तता शोधणाऱ्या एका माणसाची कथा आहे. कायदेशीर व्यवस्था, वर्ग विभाजन आणि नैतिक आत्मसंतुष्टतेचं उत्कट वर्णन यात वाचायला मिळेल.
-
अनिता देसाई यांची इन कस्टडी : ‘क्लियर लाईट ऑफ डे’ साठी प्रसिद्ध असलेल्या अनिता देसाई यांची ‘इन कस्टडी’ ही कादंबरी वाचायला हवी अशी आहे. एका छोट्या शहरातील हिंदी भाषेच्या प्राध्यापकाची गोष्ट यात वाचायला मिळते.
-
इस्मत चुगताई लिखित ‘द क्रुक्ड लाईन’ : इस्मत चुगताई या धाडसी लघुकथांसाठी प्रसिद्ध आहेत. द क्रुक्ड लाईन या पुस्तकात त्यांनी भारताच्या फाळणीपूर्वी आणि नंतरच्या काळात भारतात वाढणाऱ्या शम्मन या तरुणीची कथा लिहिली आहेत.
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार