-    फक्त एक अंजीर रोज खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा, त्वचा, हृदय आणि हाडांचे आरोग्य एकाच वेळी सुधारते. ही सवय रोजच्या आहारात सहज अंगीकारता येते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    अंजीर पचन सुधारते दररोज एक अंजीर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यात भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठता आणि आम्लपित्तावर नियंत्रण राहते. रात्री भिजवलेला अंजीर सकाळी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    हृदयाचे आरोग्य सुधारते अंजीरमधील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील ट्रायग्लिसराइड कमी करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. तसेच पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    रक्तातील साखर नियंत्रित ठेवते गोड असूनही अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यातील फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    हाडे मजबूत बनवते अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ही खनिजे हाडांची ताकद वाढवतात आणि वय वाढल्यावरही हाडे मजबूत ठेवतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    त्वचेला चमक आणते दररोज एक अंजीर खाल्ल्याने त्वचेचा ग्लो वाढतो. अंजीरमधील व्हिटॅमिन A, E आणि K त्वचेला पोषण देतात आणि एक्झिमा, सोरायसिससारख्या समस्या कमी करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    रोगप्रतिकारशक्ती वाढवते अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि झिंक असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात; त्यामुळे संसर्गांपासून संरक्षण मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    वजन नियंत्रणात ठेवते अंजीरमधील फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहते. हे आरोग्यदायी, नैसर्गिक गोड स्नॅक म्हणून उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
-    (टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  