-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो, शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, मंगळ सध्या वृश्चिक राशीत असून या राशीत २७ ऑक्टोबर रोजी मंगळाचा प्रवेश झाला होता. या राशीत २० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजून १३ मिनिटांनी चंद्राचे गोचर होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीत मंगळ-चंद्र एकत्र आल्याने ‘महालक्ष्मी राजयोग’ निर्माण होईल. ज्याचा शुभ परिणाम काही राशींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी महालक्ष्मी योग खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
जेमिमा रॉड्रिग्ज… गतवर्षी धार्मिक वादात; आता गौरवमूर्ती!