-
मोबाइल स्क्रोलिंगच्या काळात पुस्तक वाचणं दुरापस्त झालं आहे. पण आम्ही तुम्हाला सहा अशा पुस्तकांबाबत सांगणार आहोत जी पुस्तकं तुमचं ज्ञान आणि वाचनाची भूक भागवतील यात शंका नाही.
-
अदानिया शिबली यांचे ‘मायनर डिटेल’ हे पुस्तक आठवणी, ओळख आणि संघर्ष यांचा शोध घेणारी एक शांत पण प्रभावी कादंबरी आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये घडणारं कथानक आहे. जे तुमच्या विचारांवर परिणाम करु शकतं.
-
फ्रेड उहलमन यांचे रियुनियन हे पुस्तक दुसऱ्या महायुद्धापूर्वीची जर्मनीतील एक कहाणी आहे. मैत्री आणि विरह यांची भावनिक गुंतागुंत या पुस्तकात आहे.
-
थॉमस पिंचॉन यांचे स्लो लर्नर हे पुस्तक म्हणजे लघुकथांचा संग्रह आहे. हे पुस्तक तुम्हाला मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या विचार करायला लावतं यात काहीच शंका नाही. हे पुस्तक वाचून तुम्हाला वाचनाची गोडी लागेल.
-
पेंग शेफर्ड यांचे द बुक ऑफ एम हे पुस्तकही असंच एक खास पुस्तक आहे. लोक आपल्या आठवणी गमावू लागतात तेव्हा काय होतं? जादुई वास्तववादाचं उदाहरण असलेली ही खास कादंबरी आहे.
-
क्लाइव्ह बार्कर लिखित ‘द थीफ ऑफ ऑलवेज’ या पुस्तकात कल्पनाशक्तीचा वापर करण्यात आला आहे. तसंच ही कादंबरी एका विचित्र आकर्षणावर भाष्य करते. एका घरात अडकलेल्या मुलाची ही गोष्ट आहे. आश्चर्याचे धक्के देणारी ही कादंबरी आहे.
-
फ्रान्सिस हार्डिंग यांचे पुस्तक Unraveller ही एका मुलाची गोष्ट आहे. गुंतागुंत, त्यातून बाहेर येण्यासाठी मोजावी लागणारी किंमत यावर या पुस्तकात भाष्य आहे. रंजक असं या पुस्तकाचं एका शब्दांत वर्णन करता येईल.
IND-W vs SA-W: शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे विश्वचषक फायनलमध्ये अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू