-
आपण सगळंच अन्न ताजं आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर करतो; पण प्रत्येक वस्तूला फ्रिजमध्ये ठेवतानाही एक ठरलेला कालावधी असतो. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त दिवस ठेवलं, तर अन्नाची चव आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला, जाणून घेऊया कोणतं अन्न फ्रिजमध्ये किती दिवस टिकतं? (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
शिजलेला भात (Cooked Rice) फ्रिजमध्ये ठेवलेला भात तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये. त्यानंतर त्यात जीवाणू वाढू शकतात आणि त्यामुळे पोट बिघडणे किंवा फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
शिजलेले चिकन (Cooked Chicken) फ्रिजमध्ये ठेवलेले चिकन तीन-चार दिवसांच्या आतच खावे. जास्त दिवस ठेवल्यास त्याची चव आणि गुणवत्ता कमी होते. ते नेहमी हवाबंद डब्यातच साठवा. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
उकडलेली अंडी (Boiled Eggs) उकडलेली अंडी तुम्ही एक आठवड्यापर्यंत फ्रिजमध्ये ठेवू शकता. ती हवाबंद डब्यामध्ये आणि ती शक्यतो सालीसकट ठेवली, तर त्याचा ताजेपणा जास्त टिकतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
दूध (Milk) दुधाचा ट्रेटा पॅक उघडल्यानंतर तो पाच ते सात दिवसांच्या आत वापरून टाका. जर त्याला आंबट वास किंवा चव आली, तर लगेच फेकून द्या. नेहमी ३-४°C तापमानात ठेवा. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
ताज्या बेरी (Fresh Berries) स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरीसारख्या बेरीज दोन-तीन दिवसांत खाणे चांगले. ती बेरीज जास्त दिवस ठेवल्यास ती लगेच खराब होतात. ती धुऊन ठेवू नका, नाही तर ती पटकन सडतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
हिरव्या पालेभाज्या (Leafy Greens) पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या तीन ते पाच दिवसांत वापरून घ्या. त्या जास्त दिवस ठेवल्यास ती मुरतात आणि पोषण मूल्य घटते. कोरड्या व झाकलेल्या अवस्थेत ठेवा. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
मासे (Fish) कच्चे किंवा शिजवलेले मासे फ्रिजमध्ये फक्त एक-दोन दिवसच सुरक्षित राहतात. त्यापेक्षा जास्त दिवस मासे ठेवल्यास, त्यांना वास येऊन, त्यात जीवाणू वाढतात. त्यामुळे मासे नेहमी ०-४°C तापमानात ठेवा. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
सूप किंवा स्ट्यू (Soup/Stew) शिजवलेले सूप किंवा स्ट्यू तीन ते चार दिवसांपर्यंतच फ्रिजमध्ये टिकू शकते. पुन्हा खाताना ते नीट गरम करून उकळवणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
चीज (Cheese) चीज किती टिकेल हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. सॉफ्ट चीज (उदा. मोज़रेला) एक आठवडा टिकते; तर हार्ड चीज (उदा. चेडर, पार्मेझान) दोन आठवडे किंवा त्याहून जास्त टिकते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
उरलेले अन्न (Leftovers) घरचे किंवा बाहेरचे उरलेले अन्न तीन ते चार दिवसांतच संपवावे. ते जास्त दिवस ठेवल्यास त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही कमी होतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
फ्रिज साठवणूक टिप्स (Storage Tips) अन्न नेहमी हवाबंद डब्यातच ठेवा आणि फ्रिजचे तापमान ४°C किंवा त्यापेक्षा कमी ठेवा. हे जंतू वाढण्यापासून अन्नाचे संरक्षण करते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…