-
२० किंवा ३० या वयातच डोक्यात पांढरे केस दिसले, तर काळजी करू नका! चला, पाहूया लवकर केस पांढरे होण्यामागची ही आश्चर्यकारक कारणं कोणती आहेत? (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
सततचा ताण जास्त ताण घेतल्याने शरीरात फ्री रॅडिकल्स वाढतात आणि केसांच्या मुळांचे नुकसान होते. त्यामुळे केस लवकर पांढरे होतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
आनुवंशिकता केस पांढरे होण्याची वेळ आणि वेग आपल्या जीन्सवर अवलंबून असतो. आई-वडिलांचे केस लवकर पांढरे असतील, तर आपलेही तसे होऊ शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
धूम्रपान सिगारेटमधील धूर केसांच्या फॉलिकल्सना हानी पोहोचवतो. त्यामुळे मेलॅनिन कमी होऊन केसांचा रंग हरवतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
सूर्यप्रकाश जास्त यूव्ही किरणांमुळे मेलॅनिनचं नुकसान होतं आणि टाळू कमजोर होते. त्यामुळे केस अकाली पांढरे होतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
जीवनसत्त्वांची कमतरता व्हिटॅमिन B12, आयर्न, कॉपर किंवा फोलेट कमी झाल्यास केसांचा रंग टिकत नाही. मेलॅनिनची निर्मिती घटते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
स्वप्रतिरक्षा विकार व्हिटिलिगो किंवा थायरॉइड समस्या असतील, तर मेलॅनिनचं संतुलन बिघडून केस पांढरे होतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…