-  
  टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ड्रायफ्रूट्समध्ये आवश्यक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. याचे दररोज थोडेसे सेवन केल्याने हृदय, मेंदू आणि सामान्य आरोग्यास मोठा फायदा होतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  ते अधिक प्रमाणात खाणे हे गरजेइतके चांगले नसते, कारण हे कॅलरीने जड असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  सामान्य आरोग्य असलेल्या प्रौढांमध्ये रोज सुमारे २०-३० ग्रॅम ड्रायफ्रूट्स म्हणजे साधारण एक हातभर इतके पुरेसे असते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  विशेषतः बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता अशा नट्समध्ये चांगले फॅट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी हृदय, मेंदू आणि हाडांसाठी उपयुक्त आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  उच्च रक्तदाब, मधुमेह समस्या असलेल्या व्यक्तींनी मात्र स्वतःची परिस्थिती लक्षात घेऊन आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  नट्स आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश स्नॅक्स, सॅलेड किंवा स्मूदीमध्ये केला जाऊ शकतो. मात्र, प्रमाण आणि वेळ व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यवर्धक ठरते; परंतु एखादी व्यक्ती खूप प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ले, तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  दररोज थोडे ड्रायफ्रूट्स खाल्ले तर शरीराला फायदा होतो, पण प्रत्येकाने आपल्या आरोग्यानुसार किती खायचे ते ठरवायला हवे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 -  
  लेखातील माहिती सामान्य आरोग्य असलेल्या व्यक्तींसाठी आहे, वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
 
  “सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…