-
मेनिफेस्टेशन म्हणजे काय? मेनिफेस्ट करणं म्हणजे आपल्या विचारांची, विश्वासाची आणि इच्छाशक्तीची ताकद वापरून एखादी गोष्ट वास्तवात आणणं. म्हणजे आपण जे मनापासून इच्छितो, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो तेच वास्तव होतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
सोपं उदाहरण जर तुम्ही रोज विचार करता की, “मला चांगली नोकरी मिळेल” आणि त्यासाठी तयारी करता, स्किल्स शिकता, मेहनत करता तर हीच तुमची मेनिफेस्टेशन एनर्जी असते, जी तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
कसं काम करतं मेनिफेस्टेशन? या सिद्धांतानुसार, आपण जे विचार करतो तेच आकर्षित करतो. आपल्या विचारांच्या लहरी (vibrations) ब्रह्मांडाशी जुळतात आणि ज्या ऊर्जेशी आपली लय जुळते तीच गोष्ट आपल्या आयुष्यात येते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
पहिला टप्पा स्पष्ट इरादा ठेवा आपल्याला काय हवं आहे हे अगदी स्पष्ट ठरवा. ध्येय ठरलं नाही तर ऊर्जा वाया जाते. स्पष्ट हेतू असेल तर विश्वही त्याच दिशेने साथ देतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
सकारात्मक विचार ठेवा “मी नाही करू शकत” असं म्हणण्याऐवजी “मी नक्की करू शकतो” असं म्हणा. नकारात्मक विचार तुमची ऊर्जा कमी करतात, त्यामुळे मन नेहमी सकारात्मक ठेवा. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
स्वतःवर विश्वास ठेवा मेनिफेस्टेशन तेव्हाच काम करतं, जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या ध्येयावर पूर्ण विश्वास ठेवता. शंका आली की ऊर्जेचं संतुलन बिघडतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
कल्पना करा की, तुम्ही यशस्वी झाला आहात दररोज काही मिनिटं डोळे बंद करून कल्पना करा की तुम्ही आधीच तुमचं ध्येय गाठलं आहे. त्या आनंदाचा अनुभव घ्या, ती भावना जगा. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
कृती करा : फक्त विचार पुरेसे नाहीत फक्त विचार करणं नाही, तर त्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. कृतीशिवाय मेनिफेस्टेशन अपूर्ण आहे. प्रयत्न केल्याशिवाय विश्वही मदत करत नाही. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
मेनिफेस्टेशनचा खरा अर्थ मेनिफेस्टेशन म्हणजे काही मिळवणं नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला त्या ऊर्जेच्या स्तरावर नेता, जी तुमच्या इच्छेशी जुळते, तेव्हा तुमचं स्वप्नं स्वतःहून तुमच्यापर्यंत येतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ