-
एकट्याने प्रवास करणे म्हणजे नव्याने स्वतःचा शोध घेणे. यातून नवीन ठिकाणे आणि संस्कृतीचा अनुभव तर मिळतोच, पण स्वतःच्या सहवासाचा आनंद कसा घ्यावा हे सुद्धा शिकता येते. पण, तुम्ही जिथे जाल ते प्रत्येक ठिकाण सुरक्षित असेलच असे नाही. प्रवास करताना जिथे जाणार आहात त्या ठिकाणी माहिती आणि खबरदारी घेणे आवश्यक असते.
एकट्याने प्रवास करण्याची योजना आखत आहात किंवा तुमच्या पहिल्या सोलो ट्रिपची सुरुवात करत आहात? तर तुम्ही खाली दिलेल्या पर्यटन स्थळांचा नक्की विचार करायला हवा. (स्रोत-फ्रीपिक) -
जपान हे सोलो ट्रिपला जाणाऱ्यांसाठी एक आश्रयस्थान आहे. IAAPI (इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीज) चे अध्यक्ष श्रीकांत गोएंका म्हणतात, “देशात एक कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सभ्य स्थानिक लोक आणि एकट्याने जेवण आणि अनुभवांना स्वीकारणारी संस्कृती आहे.” हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे! यामुळे जपान पहिल्यांदा सोलो ट्रिपवर जाणाऱ्यांसाठी एक आदर्श पर्याय आहे. (स्त्रोत-फ्रीपिक)
-
गोएंका सांगतात की शांततेच्या शोधात असलेल्या एकटे गेलेल्या पर्यटकांना आइसलँडच्या चित्तथरारक लँडस्केप्सचा अनुभव घेता येईल. जिथला गुन्हेगारी दरात अत्यंत कमी आहे. त्यामुळे सुरक्षितेच कोणताही धोका नाही. (स्रोत-फ्रीपिक)
-
थायलंडमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपासून ते आश्चर्यकारक मंदिरे आणि बाजारपेठांपर्यंत, तुम्हाला थायलंड कधीच पुरेसं वाटणार नाही. गोएंका यांच्या मते, थायलंडमध्ये मैत्रीपूर्ण स्थानिक नागरिक आहेत. तसेच तुम्हाला परवडणाऱ्या दरात राहण्यासाठी अनेक पर्याय मिळता. (स्रोत-फ्रीपिक)
-
पोर्तुगाल हा एक मैत्रीपूर्ण देश आहे. ते एक आदर्श पर्यटनस्थळ आहे. उत्साही वसतिगृह संस्कृतीमुळे इतर पर्यटकांना भेटणे सोपे होते. (स्रोत-फ्रीपिक)
-
समृद्ध संस्कृती, सुंदर लँडस्केप्स, उत्कृष्ट अन्न आणि वाईन अनुभवण्यासाठी, न्यूझीलंड तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवे.(स्रोत-फ्रीपिक)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…