-
युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधेच नव्हे, तर सकाळचा दिनक्रम महत्त्वाचा आहे. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप हे आरोग्य टिकवण्याचे प्रमुख घटक आहेत.
-
लिंबूपाणी दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून केल्याने पचन सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त युरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मदत होते. लिंबातील व्हिटॅमिन C मूत्राद्वारे युरिक ॲसिड कमी करण्यात सहाय्यक ठरते.
-
लिंबूपाण्याच्या नंतर आले, हळद किंवा तुळशीचा हर्बल चहा घेतल्याने शरीरातील सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.
-
उठल्या उठल्या प्या २–३ ग्लास पाणी रिकाम्या पोटी पुरेसे पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील घातक द्रव्ये बाहेर पडतात. हे युरिक ॲसिडचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी ठेवण्यास मदत करते.
-
हलके व्यायाम आणि योगासनांची साथ सकाळी हलका व्यायाम किंवा योगासन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि युरिक ॲसिड बाहेर टाकण्यात मूत्रपिंडाला मदत होते. नियमित व्यायाम वजन नियंत्रित ठेवतो, जे युरिक ॲसिड नियंत्रणासाठी आवश्यक आहे.
-
नाश्त्यात कमी प्युरिनयुक्त पदार्थ खा रेड मीट, मासे यांसारख्या पदार्थांमध्ये प्युरिन जास्त प्रमाणात असते, त्यामुळे त्याऐवजी ओट्स, फळे, दही आणि संपूर्ण धान्य यांसारखे हलके व पौष्टिक अन्न घ्या.
-
चहा-कॉफी रिकाम्या पोटी टाळा रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि मूत्रपिंडावर ताण येतो, त्यामुळे सकाळी सर्वप्रथम पाणी आणि नंतर नाश्ता झाल्यावरच चहा किंवा कॉफी घ्यावी.
-
झोपेतून उठल्यावर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे पुरेसे पाणी प्यायल्याने शरीराची संतुलित कार्यक्षमता टिकून राहते आणि युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रित राहते.
-
(टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (सर्व फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…