-
ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक वर्ष, महिना, दिवस महत्वाचा मानला जातो. लवकरच २०२५ हे वर्ष संपून २०२६ या नव्या वर्षाची सुरूवात होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या नव्या वर्षातही काही ग्रहांचे ग्रह गोचर, नक्षत्र गोचर होईल. राशी परिवर्तनामुळे काही ग्रहांची युती, शुभ योग, राजयोग निर्माण होतील. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. -
पंचांगानुसार, शनी सध्या मीन राशीत विराजमान असून ०२ मार्च २०२६ रोजी शुक्र देखील मीन राशीत विराजमान होईल.
-
ज्यामुळे मीन राशीत शनी-शुक्राची युती निर्माण होईल. ही युती १२ पैकी काही राशींसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनी-शुक्राची युती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. परिक्षेची तयारी करत असलेल्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल.
-
मीन राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राची युती प्रत्येक कामात यश मिळवून देईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल.
-
शनी आणि शुक्राची युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध