-
हे कोणत्याही उपकरणांशिवाय केले जाणारे व्यायाम तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतात, प्रमुख मसल ग्रुप्स सक्रिय करतात आणि कालांतराने चयापचय सुधारण्यास मदत करतात. येथे असे सहा व्यायाम सांगितले आहेत जे तुम्ही कधीही, कुठेही करू शकता.
-
बर्पीज: हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे ज्यामध्ये स्क्वॅट, प्लँक आणि जंप यांचा समावेश आहे. बर्पीज तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतात आणि मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न करतात.
-
हाय निज्: हाय निज् करून जागी धावल्याने शरिराची ताकद, समन्वय आणि कॅलरी बर्न होण्याची क्षमता सुधारते.
-
जंपिंग जॅक: एक सोपा पण प्रभावी कार्डिओ व्यायाम जो रक्ताभिसरण वाढवतो, संपूर्ण शरीर उबदार करतो आणि चरबी जाळण्यास मदत करतो.
-
माउंटन क्लायंबर्स: हा एक कोर आणि कार्डिओ व्यायाम आहे. यामुळे तुमचे अॅब्स, खांदे आणि पाय यांचा व्यायाम होतो आणि हृदयाची गती वाढवते. याचबरोबर चरबी कमी करण्यासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.
-
प्लँक टू पुष-अप: हा व्यायाम हात, छाती आणि पोटाच्या स्नायूंना मजबूत करतो.
-
स्क्वॅट जंप: ही एक प्लायोमेट्रिक हालचाल आहे जी शरीराच्या खालच्या भागाला टोन करते आणि हृदय गती वाढवते. (Source: All Photos By Unsplash)
पैसाच पैसा! डिसेंबरमध्ये ५ राशींच्या संपत्तीत दररोज होईल वाढ; शुक्र तब्बल ४ वेळा चाल बदलणार, पैसा, संपत्ती, प्रेम वाढतच जाणार…