-
व्यायाम हा आता आपल्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे खास व्यायाम घरच्या घरी करुन पाहा. ज्यामुळे तुम्ही फिट आणि फाईन दिसाल.
-
सायकल क्रंच तुमच्या पाठीवर झोपा आणि कोपराच्या विरुद्ध कोपराला गुडघ्याला स्पर्श करताना तुमचे पाय पॅडल मारल्यासारखे फिरवा. सुटलेलं पोट कमी करण्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे.
-
पाठीवर झोपा, हात आणि पाय वर करा. विरुद्ध हात आणि पाय हळूहळू खाली करा, नंतर बाजू बदला. हा व्यायामही सुडौल शरिरासाठी आवश्यक आहे.
-
पाठीवर झोपा, पाय छताच्या दिशेने उचला आणि खालच्या अॅब्समध्ये जाण्यासाठी जमिनीला स्पर्श न करता हळूहळू पाय खाली घ्या. या व्यायामाचाही खूप फायदा होतो.
-
प्लँक हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे कमीत कमी दीड मिनिटांचा एक सेट असे तीन सेट नियमितपणे करा. तसंच प्लँक झाल्यानंतर गुडघे आळीपाळीने छातीच्या दिशेने घ्या यामुळे ताकद वाढते आणि कॅलरी घटण्यास मदत होते.
-
प्लँक पोझिशन होल्ड करा आणि शरीर एका सरळ रेषेत ठेवा. हा व्यायाम प्रकारही तुम्हाला सुडौल राहण्यासाठी फायद्याचा आहे.
-
रशियन ट्विस्ट हा देखील महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे गुडघे वाकवून बसा, थोडे मागे झुका आणि वजन धरून किंवा फक्त हात घट्ट धरून एका बाजूला वळवा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे याचेही सेट्स करा. तुम्हाला नक्की फायदा होईल.
“AI मुळे जितक्या नोकऱ्या जातील त्यापेक्षा भयंकर…”, आनंद महिंद्रा यांची कर्मचारी तुटवड्यावरील टिप्पणी चर्चेत