-
रशिया दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनवधानाने एक चूक घडली. रशियाच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर मोदींनी नेमकं काय केलं? याचा घटनाक्रम..
-
पंतप्रधान मोदी रशियाच्या मॉक्सो विमानतळावर दाखल होताच त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले.
-
मोदींना मानवंदना देण्याची तयारी रशियाने मॉस्को विमानतळावर केली होती. उपस्थित अधिकाऱयांनी मोदींना मानवंदना स्विकारण्यासाठी त्यादिशेने मार्गदर्शन केले. पण..
-
विमानतळावर भारतीय राष्ट्रगीताची धून वाजविली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकाच जागी उभे राहणे अपेक्षित होते. मात्र, एका रशियन अधिकाऱ्याच्या हातवाऱ्यांमुळे मोदींचा चुकीचा समज झाला आणि त्यांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ एका जागेवर उभे न राहता मानवंदना स्विकारण्यासाठी चालण्यास प्रारंभ केला.
-
मॉस्कोत राष्ट्रगीत सुरू असताना नरेंद्र मोदींना चालताना पाहून देशातील नागरिकांना धक्का बसला. ही चूक ध्यानात आल्यानंतर एका रशियन अधिकाऱ्याने मोदींना पुढे जाण्यापासून रोखले आणि शिष्टाचारांविषयी सांगितले.
-
त्यानंतर मोदी पुन्हा मागे आले आणि पुतीन यांच्यासमवेत राष्ट्रगीत संपेपर्यंत उभे राहिले.
-
मग राष्ट्रगीत संपल्यानंतर मोदींनी मानवंदना स्विकारण्यासाठी पुन्हा एकदा प्रारंभ केला.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…