-
bikram choudhary : भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक आणि हॉट योग गुरू विक्रम चौधरीला त्याची पूर्वाश्रमीची वकील मीनाक्षी जाफा बोडेन हिला सहा कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. विक्रमने आपला अयोग्य प्रकारे वापर करून, आपले शारीरिक शोषण केल्याचा आरोप मीनाक्षीने केला आहे. विक्रमबरोबर काम करताना आपल्याला लिंगभेदाची वागणूक सहन करावी लागल्याचा आरोपदेखील तिने केला आहे. विक्रम विरोधातील मीनाक्षीचे आरोप अमेरिकी न्यायालयात सिद्ध झाले असून, विक्रमने मीनाक्षीला सहा कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निकाल न्यायालयाने सुनावला आहे.
-
या आधी सहा स्त्रियांनी विक्रमवर बलात्कार आणि शारीरिक शोषणाचा आरोप लावला आहे.
-
२०१५ मधील डिसेंबर महिन्यात विक्रमची पत्नी राजश्री चौधरीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. राजश्रीने लॉस एंजेलिस, बेवर्ली हिल्स आणि होनोलुलुसह इतर सर्व मालमत्तेत आपला हिस्सासुद्धा मागितला आहे. विक्रम आणि राजश्रीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
-
६९ वर्षीय भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक विक्रम चौधरी 'विक्रम योग'चा संस्थापक आहे. जगभरात तो 'हॉट योग गुरू' नावाने प्रसिद्ध आहे. विक्रम आपल्या अनुयायांना ४० डिग्री सेल्सियस तापमानात योग शिकवतो. यास तो हॉट योग म्हणून संबोधतो. २२० देशांतील ७२० केंद्रांमध्ये 'विक्रम योग' शिकवला जातो.
-
विक्रम चौधरीच्या अनुयायांमध्ये मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी इत्यादी हॉलिवूड, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील हायप्रोफाईल सेलिब्रिटींचा समावेश आहे. 'फोर्ब्स'मधील माहितीनुसार विक्रम एक वेळच्या ट्रेनिंग सेशनसाठी दहा हजार डॉलर्स फी आकारत असून, वीस हजार डॉलर्समध्ये व्यक्तिगत ट्रेनिंग देतो.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?