-
देखभालीचा खर्च परवडेनासा झाल्यामुळे भंगारात काढाव्या लागलेल्या युद्धनौका 'आयएनएस विक्रांत'वरील सामग्रीतूनच नौदल मुख्यालयासमोरच्या लायन गेट येथे विक्रांतची आठवण म्हणून स्मारक उभारण्यात आले आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या स्मारकाचे उदघाटन करण्यात आले.(छाया- वसंत प्रभू)
-
आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका. (छाया- वसंत प्रभू)
-
या नौकेवर पायलट म्हणून काम करीत असताना कमोडर एम. भादा यांनी १९७१ च्या बांगलादेशी युद्धात उत्तम कामगिरी बजावली होती. त्यामुळे ही नौका मोडीत निघाली तेव्हा एम. भादा यांनी त्यावरील दोन टन सामग्री विकत घेतली. नामवंत धातू शिल्पकार अर्झान खंबाटा यांच्या सहकार्याने या सामुग्रीतून दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ हे स्मारक उभारण्यात आले.(छाया- वसंत प्रभू)
-
‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. (छाया- वसंत प्रभू)
IND vs AUS 1st T20 Live Score: भारत-ऑस्ट्रेलिया कॅनबेरातील पहिला टी-२० सामना रद्द, सूर्या-गिलने रचली होती उत्कृष्ट भागीदारी