-
दिमाखदार आणि रांगड्या मोटारसायकल निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'रॉयल एनफिल्ड' कंपनीने बहुप्रतिक्षीत 'हिमालयान' मोटारसायकल मंगळवारी दाखल केली.
-
हिमालयातील खाचखळगे आणि चढ-उतार रस्ते विचारात घेऊन '४११ सीसी'चे इंजिन असणारी 'हिमालयान' मोटारसायकलला 'रफ अॅण्ड टफ' लूक देण्यात आला आहे. (छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
'हिमालयान'ला देण्यात आलेले इंजिन नव्या दमाचे उत्तम कार्यक्षमतचे आणि पहिल्या तब्बल १० हजार किमीचा प्रवास होईपर्यंत ऑईल बदलण्याची गरज भासणार नाही, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. (छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
'रॉयल एनफिल्ड' कंपनी गेल्या पाच वर्षांपासून 'हिमालयान' मोटारसायकल साकारण्यासाठी परिश्रम घेत होती, असे कंपनीचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितले. (छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
हिमालयानचे दमदार इंजिन. (छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
'हिमालयान'चा आकर्षक लूक.(छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
हिमालयान मोटारसायकल काळ्या आणि पांढऱया या दोन रंगात उपलब्ध करून देण्यात आली आहे. (छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
'हिमालयान'ला लूक किचकट न ठेवता साधा आणि बहुपयोगी असावा हाच आमचा हेतू होता, असेही लाल म्हणाले. (छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)
-
'हिमालयान' मोटारसायकलची विक्री येत्या मार्च महिन्यापासून सुरू होणार असून, तिची किंमत मात्र अद्याप गुलदसत्यात आहे.(छाया- अभिमन्यू चक्रवर्ती)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या