-
‘महासागरातून एकात्मता’ या घोषवाक्याचा पुकारा करतानाच, सागरी सुरक्षेसाठी जागतिक मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या भारतीय नौदलाने जगभरातील नौदल आणि संरक्षणतज्ज्ञांसमोर शनिवारी जगाला अचंबित करणारे शक्तिप्रदर्शन केले.
-
कोलकाता वर्गातील स्टेल्थ विनाशिका, शिवालिक वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्स त्याचबरोबर आयएनएस विराट व आयएनएस विक्रमादित्य या बलाढय़ विमानवाहू युद्धनौका, त्यांच्यावरून स्वनातित वेगाने उड्डाण करणाऱ्या मिग-२९के व हॉक विमानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरती आणि स्वयंपूर्ण जैवइंधनाच्या बळावर चालणाऱ्या अतिवेगवान गस्ती नौका या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरल्या.
अशियाई व प्रशांत महासागराच्या टापूतील सर्वाधिक प्रबळ नौदल हा भारताचा नवा परिचय असल्याची प्रतिक्रिया उपस्थित संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली. -
नौदलाची मानवंदना व राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ एकवीस तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ‘राष्ट्रपतींची युद्धनौका’ असा बहुमान मिळालेल्या ‘आयएनएस सुमित्रा’वरून राष्ट्रपती बंगालच्या उपसागराच्या दिशेने रवाना झाले.
या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये (आयएफआर) सुमारे पन्नासहून अधिक देशांचा सहभाग असून शंभरहून अधिक युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. भारतीय नौदलातर्फे आपल्या सामर्थ्यांचे प्रदर्शन करताना स्वयंपूर्ण बनावटीच्या अद्ययावत युद्धनौकांवर विशेष भर देण्यात आला होता. ‘कोलकाता’ वर्गातील स्टेल्थ विनाशिका आणि शिवालिक वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्स या दोन्हींचे जगभरातील तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले. -
अनेक विदेशी तज्ज्ञांनी पंधरा वर्षांपूर्वी २००१ साली मुंबईत पार पडलेल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाबरोबर याची तुलना तर केलीच, पण त्याहीशिवाय गेल्या काही वर्षांत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी ठिकाणी पार पडलेल्या आयएफआरबरोबर याची तुलना करत हे आजवरचे सर्वाधिक अचंबित करणारे आयएफआर असल्याचा निर्वाळाही दिला.
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.
-
जगभरातील एकूणच राजकारण व अर्थकारण पाहता नव्याने उभ्या ठाकलेल्या अपांरपरिक सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वच नौदलांनी त्यांचा मोहरा ‘सहकार्याच्या माध्यमातून सागरी सुरक्षेकडे’ वळविणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘महासागरातून एकात्मता’ या भारताच्या बदललेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करत त्याचे समर्थन केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.
-
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्ये स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका, विमानवाहू नौका, स्वनातित विमाने यांच्या कसरती.

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…