-    गाझियाबादच्या वैशाली मेट्रो स्थानक परिसरातून बेपत्ता झालेली ‘स्नॅपडील’ कंपनीची इंजिनिअर दीप्ती सरना अखेर शुक्रवारी सकाळी घरी परतली. काल सकाळी दीप्तीने स्वत:च्याच मोबाईलवरून भावाला फोन करुन, मी पानीपतमध्ये असून रेल्वेने नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर पोहोचणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काल सकाळी ८ वाजता तिच्या कुटुंबियांनी दीप्तीला नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरून आपल्या गाझियाबाद येथील घरी आणले. पण दीप्ती पानीपतला कशी गेली हे अद्याप कळू शकलेले नाही. 
-    दीप्ती बेपत्ता झाल्यानंतर गेल्या ३६ तासांपासून तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे ती नेमकी कुठे आहे याची माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती पानिपत रेल्वे स्थानकाहून रेल्वेत चढली की, तिने जेव्हा फोन केला तेव्हा ती पानिपतला पोहोचली होती. याचा खुलासा अद्याप झालेला नाही. दीप्तीने पानिपत पोलिसांशीही संपर्क साधला नव्हता. त्यामुळे गेल्या ३६ तासांपासून ती नक्की कुठे होती हे ठामपणे सध्यातरी सांगता येणार नाही. 
-    गुडगावमधील ऑफीसमधून गाझियाबादला आपल्या घरी परतत असताना दीप्तीचे बुधवारी रात्री काही गुंडांनी अपहरण केले होते. रिक्षातील गुंडांनी तिला चाकूचा धाक दाखवून अनोळखी ठिकाणी नेले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. 
-    दीप्तीच्या बेपत्ता होण्याने तिचे आई-वडिल चिंतीत झाले होते. 
-    दीप्तीची आई वंदना 
-    दीप्ती आणि दीप्तीचे कुटुंब 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  