-
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील 'पल्स' या नाइटक्लबमध्ये गोळीबार झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री २च्या सुमारास घडली.
-
सोशल मिडियावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओरलँडोमधील पल्स नाइट क्लबमध्ये एका हल्लेखोराने अंधाधुंद गोळीबार केला. तसेच त्याने अनेकांना बंधक बनवले होते.
-
दरम्यान, हल्लेखोराला मारण्यात पोलिसांना यश आले आहे.
-
या गोळीबारात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
-
या घटनेच्या एक दिवस आधीच ओरलँडो परिसरात गायिका क्रिस्टिना ग्रिमी (२२) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली