-
रिमझिमत्या पावसाचं फायनली आगमन झालेलं आहे. पावसाळा हा ऋतू तसा पाहायला गेला तर फॅशनच्या दृष्टीने किंचित गैरसोयीचा. म्हणजे साचलेलं पाणी, कोसळणारा पाऊस, चिखल, छत्रीचं लोढणं सावरत फॅशन सावरणं जरा मुश्कीलच होतं नाही का? मग यावेळी तुमचे सौंदर्य कसे जपाल आणि त्याचसोबत पावसाळ्यात फॅशन कशी करावी यासंबंधी काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
-
त्वचाः आता मान्सून सुरु झाला असल्यामुळे तुम्हाला त्वचेची सर्वाधिक काळजी घेणं गरजेच आहे. तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी क्लिनजर किंवा फेसवॉशचा वापर करून चेहरा धुणे. जर तुमच्या चेह-यावर पुरळ असतील तर चेह-यावर बर्फ फिरवावा. यामुळे तुमच्या चेह-याला तजेलपणा येण्यास मदत होईल.
-
केसः धूळ, प्रदूषण आणि आर्द्रतेचा आपल्या केसांवर परिणाम होतो. त्यामुळे ऋतू कोणताही असो पण केसांच्या मुळांना तेल किंवा सिरम लावणे केव्हाही चांगलेच आहे. दरम्यान, हेअरस्टाइल करताना मेस्सी पोनीटेल, खजूर वेणी किंवा आंबाडा बांधून तुम्ही तुमचा मान्सून लूक पूर्ण करू शकता.
-
कपडेः पावसाळ्यात वजनाने हलके, पटकन वाळतील असे सुटसुटीत कपडे वापरावेत. लाइटवेड डेनिम्स, नॉन क्रशेबल कॉटन्स, केप्रीज वापराव्यात. शक्यतो कॉटनचे कपडे वापरावेत जेणेकरून हे कपडे लवकर वाळण्यासही मदत होते.
-
वॉटरप्रूफ मस्कराः पावसाच्या पाण्यामुळे डोळ्यांचा मेकअप पुसला जाण्याची दाट शक्यता असल्यामुळॆ डोळ्यांचा मेकअप करताना विशेष काळजी घ्या. पापण्यांना कर्ल करून नेहमीच्या मस्करापेक्षा वॉटरप्रूफ मस्करा वापरावा. जेणेकरून तो मस्करा पसरणार नाही. गुलाबी, लाल, भगवा, लाइट ब्राउन अशा ट्रेण्डी रंगांचा या सिझनमध्ये वापर करा.
तेलकट मेकअप टाळाः मान्सूनमध्ये तेलकट सौंदर्य प्रसाधने वापरू नका तसेच जास्त गडद मेकअपही करणे टाळा. त्यापेक्षा मिनरल बेस फाउन्डेशन, वॉटरप्रूफ आयलायनर आणि मॅट कलर लिपस्टीकचा वापर करा. मॅट ब्रॉन्झरः चकमकी असणा-या कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाचा मान्सूनमध्ये वापरू नका. त्यापेक्षा मॅट ब्रॉन्झर म्हणजे सौम्य आणि चकमकी नसणा-या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करा. -
चप्पलः पावसाळ्यात चामड्याच्या चपला घालू नका. चपलांची निवड करतानाही प्लॅटफॉर्म हिल्स वापरणं केव्हाही चांगलं. बाजारात ऑल सीझन वेअर्समध्ये फॅन्सी स्लिपर्सपासून शूजपर्यंतच्या भरपूर व्हरायटीज सध्या पाहायला मिळतात. त्यातही गम बूटमध्ये खूप प्रिन्टस आणि रंग उपलब्ध आहेत आणि हे बूट दिसायलाही स्टाइलिश वाटतात.
-
लिपस्टिकः लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना साजेशा रंगाच्या पेन्सिलने आउटलाइन करा. पावसाळ्यात मॅट फिनिशिंग असलेली लिपस्टिक लावावी. ग्लॉस फिनिशिंग असलेली लिपस्टिकदेखील तुम्ही वापरू शकता. सहसा पावसाळ्यात न्यूड कलर वापरलेले केव्हाही उत्तम.
-
कन्सिलरः मेकअपपूर्वी कन्सिलर लावावे. पावसाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असल्याने चेह-यावर फाउंडेशन लावणे टाळावे. कन्सिलर लावल्यानंतर लिक्विड फाउंडेशन अथवा लूज पावडर वापरून मेकअप पूर्ण करावा.
-
पावडर आयशॅडोः पावसाळ्यात गडद रंग किंवा स्मोकी मेकअप डोळ्यांना करू नका. तसेच, आयशॅडो वापरताना ते पावडर आयशॅडो असावेत. या प्रकारचे आयशॅडो बराच वेळ राहतात.
-
बॅगः चामड्याच्या बॅगचा पावसाळ्यात अजिबात वापर करू नका. त्याऐवजी कॅन्व्हास बॅग वापरा. या बॅग भिजल्यास लवकर सुकतात.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग