आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चंदीगढमध्ये सामूहिक योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुमारे ३० हजार नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यामध्ये १०० दिव्यांग व्यक्तींचाही समावेश होता. (Source: Twitter/@PIB_India) -
कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना ८ गटांत विभागण्यात आले होते. त्यांना योग शिकवण्यासाठी ५०० प्रशिक्षकही नेमण्यात आले होते. (Source: Twitter/@PIB_India)
-
दिव्यांग व्यक्तींशी चर्चा करताना नरेंद्र मोदी. (Source: Twitter/@PIB_India)
-
जास्तीत जास्त लोकांनी रोज नित्यनेमाने योग करावा अधिकाधिक जणांनी योग शिकवण्याचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन मोदींनी केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी सूर्यनमस्कारावर आधारित टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले.
-
पुढीलवर्षीपासून योगदिनानिमित्त दोन पुरस्कार देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले. एक पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर तर दुसरा आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात येईल.

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’