-
आपण भारतीय अनेक रेकॉर्ड्स करतच असतो. उदाहरणादाखल टीव्हीवर क्रिकेट मॅच सुरु असते तेव्हा करोडो भारतीयांचे दोन करोडो डोळे एकसाथ कित्येक तास पिक्चरट्यूबकडे नजर लावून असतात हा विक्रमच.. विनोद सोडा. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतीयांच्या नावावर अद्भूत आणि विचित्र असे रेकॉर्ड आहेत जे तुम्हाला माहितही नसतील. चला तर बघूया कोण कोणते रेकॉर्ड भारतीयांच्या नावावर आहेत.
-
अहमदाबाद येथील एका रेस्तरॉमध्ये ७ ऑक्टोबर २०१३ ला एक भला मोठा डोसा तयार करण्यात आला होता. प्लेटमध्ये न मावणारा हा डोसा ५३ फुट लांबीचा होता. इतरवेळी डोसा करायला १५ मिनिटे थांबा असे सांगणाऱ्या आचाऱ्यांनी जगातला हा एवढा मोठा डोसा केवळ १५ मिनिटांतच तयार केला होता.
-
सेल्फीचे वेड तर आता जगभरातील सर्वच नागरिकांना लागलेले आहे. या सेल्फी वेड्या जगात सर्वाधिक लोकांनी एकाचवेळी सेल्फी काढण्याचा विक्रमही भारतीयांच्या नावावर आहे. फेडरल इन्सिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थी आणि कर्मचा-यांनी एकत्र येऊन सेल्फी काढण्याचा विक्रम केलेला. यात जवळपास १००० वर लोक सहभागी झाले होते.
-
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रोकॉडर्स’मध्ये जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून ज्योती आमगे हिच्या नावाची नोंद करण्यात आलेली आहे. ज्योती यांची उची १ फूट ११ इंच एवढी आहे.
-
लखनौ येथे १६ नोव्हेंबर २०१४ रोजी कंडोमपासून कलाकृती बनवण्याचा विक्रम करण्यात आला होता. यासाठी जवळपास ४४१८ कंडोमच्या पाकिटांचा उपयोग करण्यात आलेला. या कलाकृतीस आयआयएम लखनौच्या वार्षिक प्रदर्शनात दाखविण्यात आलेले.
-
जगातील सर्वात मोठी पगडी
-
जामनगर येथील जलाराम मंदिर जिर्णोद्धार समितीने सर्वात मोठी चपाती करण्याचा विक्रम केलेला. या चपातीचे वजन तब्बल ६३.९९ किलो इतके होते.
एकाच वेळी सर्वाधिक महात्मा गांधी एकाच ठिकाणी असण्याचा अनोखा विक्रमही भारतीयांच्या नावावर आहे. कोलकत्यातील ४८४ लहान मुलांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासारखा वेश करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. -
एका तासात सर्वाधिक लोकांना मिठ्या मारण्याचा विक्रम २९ सप्टेंबर २०१२ रोजी जयसिम्हा रविराला या भारतीयाने केला होता. त्यांनी २४३६ लोकांना तासाभरात मिठ्या मारल्या. हा विक्रमाचे आयोजन आंध्र प्रदेशातील टेक्कली येथील आदित्य इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉट अॅण्ड मॅनेजमेन्ट येथे करण्यात आले होते.
-
केरळ संगीत नाटक अकॅडमीच्या कलामंडलम हेमलता यांनी अजिबात न थांबला सलग १२३ तास १५ मिनिटे नृत्य केले. त्यांनी न थांबता मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार सादर केला होता. दोन मुलांच्या आई असलेल्या हेमलता यांनी २० सप्टेंबर पासून ते २६ सप्टेंबर २०१० पर्यंत नृत्य करण्याचा विक्रम केलेला.
-
भारतीय आचा-यांनी १ मार्च २००८ साली सर्वात १२००० किलो तांदूळ आणि भाज्यांपासून सर्वात मोठी बिर्याणी करण्याचा विक्रम केला होता.
चेन्नई येथील वायएमसीए मैदानात ७ डिसेंबर २०१४ रोजी सर्वात मोठी मानवी झेंडा तयार करण्यात आला होता. -
आपल्या लांबलचक मिश्यांसाठी राम सिंह चौहान जगप्रसिद्ध आहेत. चौहान यांच्या मिश्या जरा अधिकच लांब आहेत. नाकापासून मोजल्यास दुसरे टोक नऊ फुटावर येते म्हणजे एकूण १८ फूट लांब इतकी त्यांची मिशी आहे.
-
हजारो संताक्लॉजनी एकत्र येणे अन ते सुद्धा इंग्लंड अमेरिकेत नव्हे तर भारतात हे काहींना अजब वाटेल परंतु सत्य आहे. दक्षिणेतील थीसूर गावात २०१४ साली तब्बल १८११२ लोकांनी संताक्लॉजची वेशभूषा करून एका कार्यक्रमात हजेरी लावली.
-
नाकाने टंकलेखन म्हणजे चक्क नाकाने टाईप रायटरची बटने दाबत टायपिंग करण्याचा विक्रम विनोदकुमार चौधरी या भारतीयाने केला. त्यासाठी त्याने त्याला दिलेली १०३ अक्षरे केवळ ४६.३० सेकंदात टाईप केली. हा त्याचा विक्रम त्याने २२ डिसेंबर २०१४ साली केला.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”