-
जम्मू-काश्मीरच्या पंपोर येथे भारतीय लष्कराच्या वाहनावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले आहेत. तर सुमारे २० जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाचे जवान आणि जवानांमध्ये सध्या जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा)
श्रीनगर- जम्मू महामार्गावरील लष्करी छावणीच्या परिसरात असणाऱ्या पठाण चौकीजवळ दोन ते तीन दहशतावद्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला चढवला. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा) हे जवान फायरिंग रेंजकडून श्रीनगरकडे परतत होते. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा) या हल्ल्यात जखमी झालेल्या २० जणांपैकी काहीजणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (छाया-एक्स्प्रेस वृत्तसेवा)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”