-
आत्तापर्यंत लोकांच्या मनात विशालकाय हल्कची प्रतिमा ही काल्पनिक सुपरहिरो अशी आहे. जो केवळ हॉलिवूडच्या चित्रपटांमधून पाहायला मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण या हल्कचे चाहते आहेत.
-
हा सुपरहिरो केवळ रिअल लाईफ सुपरहिरो नसून प्रत्यक्ष जीवनातदेखील अशाच प्रकारची बलदंड व्यक्ती पाहायला मिळते. या रिअल हल्कची छायाचित्रे अलीकडे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत. इराणमधील साजाद गरिबी नावाचा हा २४ वर्षीय बलदंड युवक एक वेटलिफ्टर आहे.
-
विशाल शरीरयष्टीचा हा वेटलिफ्टर रियल हल्क आणि पर्शियन हरक्युलिस नावाने ओळखला जातो. याचे वजन १७५ किलोग्रॅम असल्याचे सांगितले जाते.
-
हल्क प्रमाणे पीळदार शरीर असलेला साजाद चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.
-
साजादचे शरीर इतके विशाल आहे की त्याला कारमध्ये बसायलादेखील त्रास होतो. अनेक प्रयत्नांती तो कारमध्ये शिरला, तरी कारमधून बाहेर पडण्यास त्याला खूप त्रास होतो.
-
विशाल शरीरयष्टीच्या साजादला पाहून काहीजणांना घाबरायलादेखील होते.
-
परंतु इंस्टाग्रामवरील साजादची छायाचित्रे पाहून त्याची ही शरीरयष्टी खरी नसून, छायाचित्रे फोटोशॉपचा वापर करून एडिट केल्याचा आरोप काहींनी केला.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय