'क्वीन' चित्रपटाच्या काहीशी जवळ जाणारी घटना पाकिस्तानच्या लाहोर प्रांतात राहणाऱ्या हुमा मोबिन हिच्यासोबत घडली आहे. एकटीनेच 'हनीमूनला' जात कंगणाने जो काही धुमाकूळ घातला होता अगदी तसाच धुमाकूळ हुमाने पोस्ट केलेले फोटो घालत आहेत. तिच्या या आगळ्यावेगळ्या 'हनीमून'च्या फोटोंनी तिला सोशल नेटवर्किंगची 'क्वीन' बनवली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. नवविवाहित हुमा आणि तिचा पती अरसलान ग्रीसला जाणार होते, त्यांनी दुतावासाकडे व्हिसा मिळण्यासाठी रीतसर आवेदनही केले होते. पण, व्हिसा मिळण्यासाठी आवेदन केलेल्या अरसलानने संबधित दुतावासाकडे मागोवा न केल्यामुळे त्याला व्हिसा नाकारण्यात आला. ग्रीसची ही सहल आधीपासू्नच आखल्यामुळे पतीशिवाय हुमाने या सहलीवर जाण्याचा निर्णय घेतला. हुमा या सहलीवर गेली खरी पण तिथेही ती तिच्या पतिच्या आठवणीत असे काही फोटो काढले की ज्यांना तोड नाही. हुमाच्या भटकंतीतल्या विरहाचे हे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर चांगलेच गाजत तिच्या या हटके सहलीला आणखीनच प्रसिद्धी मिळवून देत आहेत. -
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)
-
(Source: Huma Mobin/Facebook)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”