-
जगात एका चेहऱ्याची जवळपास सात माणसे असतात हे आजवर अनेक ठिकाणी ऐकण्यात आले असेलच, अगदी त्याच चेहऱ्याची सात माणसे नसली तरीही त्यातील काहीक बाबी अगदी तंतोतंत मिळत्याजुळत्या असतातच. सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर अशाच 'चेहराफेरी'चे फोटो प्रचंड गाजत आहेत. बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्यापैकी कित्येकांनी प्रियांका चोप्राचे फोटो समजून ते लाइकही केले असावेत. पण ते फोटो प्रियांकाचे नाहीत. सध्या बॉलीवुडसोबतच हॉलीवुडमध्येही चर्चेत असणारी प्रियांका आता तिच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीच्या फोटोंमुळे गाजत आहे.
-
२१ वर्षीय नवप्रीत बांगा ही वॅन्कुवरस्थित एक यूट्यूबर असून ती एक फिटनेस व्लॉगरही आहे. पण, कधीकधी ती स्वत:सुद्धा स्वत:चा चेहरा पाहून आश्चर्यचकित होत असावी.
-
नवप्रीतच्या 'ब्राउनगर्ल लिफ्ट्स' या इन्स्टाग्राम अकाउंटवर १८००० पेक्षा जास्त फॉलोअर्स तिचे हुबेहुब प्रियांका चोप्रासारखे दिसणारे फोटो पाहून थक्कच आहेत.
-
प्रियांकाच्या रंगापासून तिचा बांधा, केशरचना, फॅशन सेन्स सारं काही नवप्रीतशी इतके मिळतेजुळते आहे कि, तिने पोस्ट केलेले फोटो पाहताना क्षणार्धासाठी ती खुद्द प्रियांकाच असल्याचा भास होतो. हा झाला तिचा दिसण्याचा भाग, पण नवप्रीतचा आवाजही 'पिगी चॉप्स'च्या आवाजाच्या फार जवळ जाणारा आहे.
-
सध्या इंटरनेटवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र झळकणारे नवप्रीतचे हे फोटो आणि प्रियांका व तिच्या चेहऱ्यातल्या साम्याची किमया अनेकांना थक्क करत आहे.
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts
-
छाया सौजन्य- instagram @browngirllifts

माजी आमदार चोथेंनी चार दशकांची शिवसेनेची साथ सोडली