-
लॉस वेगासमधील ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल शहरातील तिसरी सर्वात उंच इमारतीपैकी एक आहे.
-
शिकागोमधील बऱ्याच लोकांना ट्रम्प यांचे हे हॉटेल त्रासदायक वाटते. या हॉटेलवर बंदी घातल्यानंतर पाच वर्षानंतर ट्रम्प यांनी या इमारतीच्या 16 व्या मजल्यावर पुन्हा आपले नाव कोरले.
-
१९९० मध्ये अटलांटिका शहरात ट्रम्प यांनी चक्क ताजमहालसारखी वास्तू निर्माण केली. जवळ जवळ एक अरब डॉलर खर्च करुन या ठिकाणी उभारलेल्या कसिनो आणि हॉटेल २५ वर्षानंतर दिवाळखोरीत निघाले. २०१४ मध्ये विकले गेलेल्या या वास्तुचा ट्रम्प ब्रँड आजही कायम आहे.
-
न्युयॉर्कमधील ट्रम्प टॉवर डॉनाल्ड ट्रम्प यांची खास संपत्ती आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या अभियानादरम्यान ट्रम्प यांचे मुख्यालय या ठिकाणी होते. युरोपातील लोकप्रिय दिग्गजांसाठी ही इमारत माहेर घर असल्यासारखी आहे. ट्रम्प यांचे कुटूंब देखील याच इमारतीमध्ये वास्तव्यास आहे.
-
न्यूयॉर्कमधील संगमरवर आणि अनोख्या रंगात उभारलेले ट्रम्प टॉवर स्थानिकांना नापसंत आहे. ट्रम्प समर्थकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
-
पनामा शहरातील ट्रम्प ओशन क्लब हॉटेलमध्ये ७०० अपार्टमेंट आणि खासगी यॉट क्लब आहेत. लॅटिन अमेरिकेतील ही सर्वात उंच इमारत आहे. या वास्तुजवळ गरिब लोकांची वस्ती असल्यामुळे श्रीमंत लोक या ठिकाणाला कमी पसंती देतात.
-
स्कॉटलंडमधील ट्रम्प आंतरराष्ट्रीय गोल्फ लिंक्स या मालमत्तेस डॉनल्ड ट्रम्प "जगातील सर्वोत्तम गोल्फ कोर्स" असल्याचे मानतात.
-
पहिला ट्रम्प टॉवर इस्तंबुलमध्ये उभारण्यात आला. सध्या या टॉवरवरील ट्रम्प ब्रँड हटविण्याची मागणी जोर धरत आहे. या कॉम्प्लेक्सचा मालक एक तुर्की अरबपती असून ट्रम्प यांच्या मुस्लीमविरोधी भूमिकेमुळे तुर्कस्तान लोक नाराज आहेत.

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार