-
मुंबई-गोवा महामार्गावरील राजेवाडी फाट्याजवळील ब्रिटीश काळात बांधलेला आणि शंभर वर्षे जूना पूल सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला.
-
मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या पूलावरून निघालेल्या दोन एसटी बससह सहा ते सात वाहने यामुळे सावित्री नदीच्या पाण्यात वाहून गेली.
-
या वाहनांचा आणि त्यामधील प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नसून, घटनास्थळी मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान दाखल झाले आहे. मदतीसाठी नौदल आणि तटरक्षक दलालाही पाचारण करण्यात आले आहे.
-
कमकुवत झालेल्या या पूलावरून वाहतूक सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून रायगडमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हा पूल वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. हा पूल १०० वर्षे जुना होता.
-
मुंबई गोवा महामार्गावरून मंगळवारी रात्री प्रवास करीत असलेले जे प्रवासी घरी पोहोचले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी ०२१४१ २२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
-
जुन्या पूलाशेजारी नवा पूल बांधण्यात आला आहे. तरीही जुना पूल वापरात ठेवण्यात आला होता. त्याचा वापर बंद करण्यात आला असता, तर ही दुर्घटना टळली असती, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
-
वाहून गेलेल्या वाहनांचा आणि त्यामधील प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नसून, घटनास्थळी मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) जवान दाखल झाले आहे.
-
नौदल आणि तटरक्षक दलाकडूनही हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्यात मदत केली जात आहे.
-
प्राथमिक अंदाजानुसार एसटी आणि सात तेआठ वाहनांबरोबर २२ जण नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
-
सध्या एनडीआरएफकडून नदीत वाहून गेलेल्यांचा कसून शोध घेण्यात आहे. सध्या या भागात पाऊस थांबला असला तरी नदीचा प्रवाह वेगवान आहे. त्यामुळे नदीत राफ्टर्सना उतरवून शोध घेतला जात आहे.
-
सध्या या भागात पाऊस थांबला असला तरी नदीचा प्रवाह वेगवान आहे. त्यामुळे नदीत राफ्टर्सना उतरवून शोध घेतला जात आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”