नितांतसुंदर निसर्ग, पुरातन वास्तू, देखणी मंदिरं आणि अतिशय सुंदर अशा बुद्धमूर्ती यामुळे लाओस ऊर्फ लाव हे आवर्जून जावे असेच पर्यटनस्थळ आहे.

लाव म्हणजेच लाओस, हा आग्नेय आशियातील थायलंड, व्हिएतनाम, कंबोडियासारखाच एक देश. मंगोलियाप्रमाणेच या देशाला सागरी हद्द नसल्याने हा देश ‘लँड लाँक कंट्री’ म्हणून ओळखला जातो. हिरव्यागार फो ब्या पर्वतरांगा, काही ठिकाणी सपाट पठारी प्रदेश असलेल्या या देशाच्या सीमा मेकाँग नदीमुळे थायलंड, अॅनमीत पर्वतामुळे व्हिएतनाम्, तर लुअंगप्रबंग रेंजेसमुळे म्यानमार अशा देशांलगत आहेत.

गोल्डन टॉयलेट
आम्ही थायलंडमधील चिअँग माय येथून बसने चिअँग राय येथे आलो. इथे बौद्ध देवळांपेक्षा वेगळीच वात् रोंग, व्हाइट टेम्पल्स आहेत. अगदी वेगळ्याच धर्तीवरील ही देवळं पांढऱ्या सिमेंटने बांधलेली आहते. देवळांभोवती लहानसा कालवा आहे. तेथे जाण्यासाठी आपल्याला एक लहानसा पूल ओलांडावा लागतो. खाली पाण्यात हात उंचावलेल्या मूर्ती आहेत. हा देखावा माणसाची कधीच न शमणारी इच्छा, हव्यास दर्शवतो. या गोष्टींचा त्याग करू तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो, असं त्या मूर्ती आपल्याला सांगू पाहतात. त्याबरोबरच स्वर्गद्वारावर मृत्यू, राहू उभे आहेत. आपलं प्राक्तन त्यांच्या हाती आहे. आपण लायक असलो तर यक्ष, किन्नर आपलं स्वागत करतील असाही या मूर्तीचा सांगावा आहे.
फ्राबंग बुद्धाचे देऊळ, लुआंग प्रबंग
नदीकाठची सुपीक जमीन, हिरवी कुरणं, सदाबहार डोंगर बघत बघत प्रवास चांगला झाला. दोन दिवसांनी लुअंग प्रबंग या पर्यटनस्थळी पोहोचलो. तत्पूर्वी वाटेवर पाक् यु केव्हज् या दोन गुंफा आहेत. त्यातली पहिली गुंफा आपल्याला बोटीतून दिसते. नदीतून ये-जा करणाऱ्या लोकांचे संरक्षण व्हावे या समजुतीतून लोक पूर्वीपासून तिथे बुद्धाच्या मूर्ती ठेवीत. अजूनही ती प्रथा सुरूच आहे. -
व्हाइट टेम्पल
लुअंग प्रबंग हे गाव मेकाँग व नाम् खान् नद्यांच्या संगमावर असल्याने गावाच्या सभोवार भरपूर वृक्षांनी बहरलेले डोंगर आहेत. हा सगळा परिसर जगप्रसिद्ध सिल्क रुटच्या मार्गावर असल्याने तो पहिल्यापासूनच आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टीने पुढारलेला आहे. एकेकाळी ही देशाची राजधानी होती. पण शेजारच्या ख्मेर राज्याच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी ती दूर व्हीअँटीन येथे हलवली गेली. त्यानंतर ती आजपर्यंत तिथेच आहे.

काँग शी फॉल्स
पूर्वी ही देशाची राजधानी असल्याने साहजिकच इथे राजवाडा होता. त्याचं आता नॅशनल म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. गंमत म्हणजे हा राजवाडा नदीच्या संगमावर असल्याने विदेशी पाहुणे नदीच्या प्रवासातून थेट राजवाडय़ातच येत. येथे राजघराण्याचे वास्तव्य १९७५ पर्यंत होते.
पाक यु केव्हज्
राजवाडा तसा भव्यदिव्य नाही, पण त्यात तीन पिढय़ांची माहिती वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. राजघराण्यातील लोकांचे पोषाख, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू, राज्याभिषेकाचे सिंहासन, शिलालेख असं बरंच काही तिथे पाहायला मिळतं. -
म्युझियमच्या आवारातील फा नाम् राजा
इथला काँग शी फॉल हा १५० मीटर उंचावरून तीन-चार स्तरांवर कोसळणारा प्रपात वैशिष्टय़पूर्ण आहे. असे म्हणतात की एके काळी कोण्या बौद्ध भिक्षूने ध्यान करताना पाण्याचा आवाज ऐकला, कुतूहल म्हणून तो पाहावयास गेला आणि हा धबधबा पाहून आश्चर्यचकित झाला. इतक्या उंचीवरून धबधब्याचे पाणी वेगाने पडत असल्याने प्रत्येक पातळीवरील खडकांचे वेगवेगळे आकार तयार झाले आहेत.

म्युझियमच्या आवारातील प्राचीन वटवृक्ष
माऊंट फुसी हा इथला सर्वात उंच डोंगर. या ठिकाणी नागदेवता व हुतात्म्यांची पूजा केली जाते. भरपूर पायऱ्या चढून आपण पॅगोडा पाहायला येतो. आत नेमीप्रमाणेच बुद्धाच्या मूर्ती, जुने साहित्य वगैरे गोष्टी आहेत. बरेच पर्यटक येथील डोंगरमाथ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी येतात.

लुआंग प्रबंग येथील वात शिएंग थांग
लाओमध्ये जंगल भरपूर असल्याने इथे लाकडाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे पूर्वीची सर्व देवळे लाकडाचीच असत. फ्रेन्च राजवट असल्याने इथल्या बांधकामामध्ये लाओ व फ्रेन्च स्थापत्याचा मिलाफ दिसून येतो.

लुआंग प्रबंग येथील वात शिएंग थांग
वँग व्हिएंग हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. व्हिएतनाम येथील हो लाँग बे येथील समुद्रात असलेल्या कॅल्शिअमच्या डोंगराप्रमाणेच पण इथे हे डोंगर जमिनीवर आहेत. या डोंगरातून वाहणाऱ्या नाम् सांग नदीला चढउतार, वळणं असल्याने कायाक, टय़ुबिंग करणाऱ्यांना मजा येते.
लुआंग प्रबंग येथील वात शिएंग थांग
व्हिअॅँटीन ही लाओची राजधानी. ती मेकॉँग नदीकिनारी असल्याने फा नाम राजाच्या काळात हे घडामोडींचे ठिकाण होते. येथील वात् लाओचे हे राष्ट्रीय प्रतीक मानले जाते. (नोव्हेंबर ते एप्रिल हा सीझन इथे भेट देण्यासाठी चांगला आहे. थायलंडहून इथे जाणं सोयीस्कर आहे.) गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com
लेख वाचाण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारचा मोठा निर्णय! हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत: मंजुरी, माजी न्या. शिंदेंचा मनोज जरांगेंना शब्द