-
महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून ख्याती असलेल्या गणरायाला गुरूवारी मुंबईकरांनी वरूणराजाच्या साथीने भावपूर्ण निरोप दिला. (छाया- प्रदीप दास)
-
हवामान खात्याने भाकित वर्तविल्याप्रमाणे मुंबई आणि परिसरात पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, तरीही बाप्पांना निरोप देताना मुंबईकरांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही. छाया- प्रदीप दास)
-
गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जनसागर उसळला होता. छाया- प्रदीप दास)
-
गिरगाव चौपाटीसह मुंबईच्या सहा चौपाट्यांवर घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनसाठी जनसागर उसळला होता. छाया- प्रदीप दास)
-
सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजुकायाचा बाप्पा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या मुंबईतील मानाच्या गणपतींनी निरोप देण्यासाठी लालबाग-परळ परिसरात मोठा जनसमुदाय जमला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
बाप्पाचे रूप डोळ्यात साठविण्यासाठी पावसाची तमा न बाळगता अनेकजण रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचे चित्र दिसत होते. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
विसर्जन मिरवणुकीत बेभान होऊन नाचताना गणेशभक्त. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगजवळ या मानाच्या गणपतींवर पुष्पवृष्टी करण्यात आल्यानंतर या मिरवणुका गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
गिरगाव चौपाटीजवळ गिरगावचा राजा, गिरणगावचा राजा, काळाचौकीचा महाराजा, चंदनवाडीचा राजा, खेतवाडीचा महाराजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींना पाहण्यासाठीही लोकांनी मोठी गर्दी केली होती.
-
मुंबईत ७२ नैसर्गिक आणि २६ कृत्रिम स्थळांवर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती आणि पुण्यातील दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
मुंबईतील सुमारे ५० हजार पोलिस यावेळी बंदोबस्ताकरिता रस्त्यावर तैनात करण्यात आले होते.
प्रमुख चौपाटय़ांवर टेहळणीकरता पोलिसांकडून ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विसर्जन मिरवणुकांवरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस लक्ष ठेवून होते. (छाया- गणेश शिर्सेकर) -
गणेशमूर्ती विसर्जनासाठी खोल समुद्रात नेल्या जात असताना. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
गिरगाव चौपाटीवर विसर्जनसाठी दाखल झालेली गणरायाची सुबक मूर्ती. (छाया- गणेश शिर्सेकर)
श्रीगणेशाचे मोहक रूप. (छाया- गणेश शिर्सेकर) -
गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झालेल्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
गिरगाव चौपाटीजवळ गिरगावचा राजा, गिरणगावचा राजा, काळाचौकीचा महाराजा, चंदनवाडीचा राजा, खेतवाडीचा महाराजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींना पाहण्यासाठीही लोकांनी मोठी गर्दी केली होती.
-
-
सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात नेली जात असताना. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
लाडक्या बाप्पाला निरोप देताना मंडळाचे कार्यकर्ते. (छाया- गणेश शिर्सेकर)

२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश