-
जम्मू काश्मीरमधील नागरोटामध्ये लष्करी तळवार मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सैन्याचे पाच जवान आणि दोन अधिकारी असे सात जण शहीद झाले. या सात वीरपुत्रांचा घेतलेला हा आढावा….
-
मेजर कुणालगीर गोसावी: २८ वर्षीय गोसावी हे महाराष्ट्रातील पंढरपूरचे रहिवासी होते. गेल्या ९ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि ४ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. गोसावी सुट्टीवर घरी आले होते मात्र सीमा रेषेवरील तणावामुळे त्यांना पुन्हा बोलावण्यात आले होते.
-
लान्सनायक संभाजी कदम: ३३ वर्षीय कदम हे नांदेडमधील जानापुरीचे रहिवासी होते. २००१ मध्ये कदम सैन्यात भरती झाले. त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. गेल्या २ वर्षांपासून ते पुण्यातील लष्करी तळावर होते. मात्र सीमा रेषेवरील तणावामुळे त्यांना तातडीने सीमा रेषेवरील सांबा सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले होते.
-
मेजर अक्षय गिरीश कुमार: ३१ वर्षीय अक्षय गिरीश कुमार हे कर्नाटकमधील कोरामंडलचे रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी संगीता रविंद्रन आणि ३ वर्षाची मुलगी नैना असा परिवार आहे.
-
हवालदार सुखराज सिंग: ३२ वर्षीय सुखराज सिंग हे पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी हमरित कौर आहेत. माझी कोणतीही मागणी नाही. पती देशासाठी शहीद झाल्याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया हमरित कौर यांनी दिली आहे.
-
ग्रेनेडियर राघवेंद्र सिंह: २८ वर्षीय राघवेंद्र सिंह हे राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी अंजना आहे.
-
रायफलमॅन असीम राय: असीम राय हे नेपाळमधील खोतांग गावाचे रहिवासी होती. त्यांच्या पश्चात पत्नी मधूकला राय आहेत.
-
चितरंजन देबबर्मा: ३७ वर्षीय चितरंजन हे त्रिपूरामधील कलमपूर जिल्ह्याकील गरिंगपारा गावातील रहिवासी होते. चितरंजन यांच्या पश्चात पत्नी नमिता आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग