-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कन्या केतकी गडकरी यांचा रविवारी आदित्य कासखेडीकर यांच्याशी नागपूरमध्ये विवाह झाला. दोघेही जूने मित्र असून आदित्य हे सध्या फेसबुकमध्ये कार्यरत आहेत. केतकी या गडकरी यांची कनिष्ठ कन्या आहे.
-
विशेष म्हणजे आदित्य यांचे वडील रवी कासखेडीकर आणि नितीन गडकरी यांचे फारसे पटत नाही. रवी कासखेडीकर यांनी नागपूर महापालिकेतील पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यावरुन नितीन गडकरींविरोधात आंदोलन केले होते. गडकरी यांना निखिल आणि सारंग ही दोन मुलदेखील आहेत.
-
गडकरी यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्याला राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, भाजपाध्यक्ष अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेतेमंडळी सहभागी झाली होती. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेअध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज आहिर, पीयूष गोयल, योगगुरु रामदेवबाबा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही या सोहळ्यात उपस्थित होते.
-
रविवारी विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता रिसेप्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हीआयपी मंडळींसाठी नागपूर आणि दिल्ली अशा दोन ठिकाणी रिसेप्शन होणार आहे. ६ डिसेंबरला नागपूर तर ८ डिसेंबरला दिल्लीत रिसेप्शन होईल. दिल्लीतील कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
-
गडकरींच्या कन्येच्या शाहीविवाह सोहळ्यासाठी १० हजार जणांना निमंत्रण देण्यात आले होते. व्हीव्हीआयपींसाठी ५० चार्टड विमाने नागपूरमध्ये येतील अशी चर्चा होती. मात्र गडकरी यांच्या कार्यालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग