-
ठाण्यातील पातलीपाडा येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली सात ते आठ जण अडकल्याची भीती आहे.
घोडबंदररोडवर हिरानंदानी इस्टेटमध्ये पातलीपाडा येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीसाठी २५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. मातीचा ढिगारा कोसळल्यानंतर त्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाने बचावकार्य हाती घेतले. -
दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी बचावकार्य हाती घेतले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले.
-
मातीचा ढिगारा उपसण्यासाठी अग्निशमन दलाने पोकलेनचीही मदत घेतली. त्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले.
-
मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, त्याखाली दबलेल्या कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली ७ ते ८ जण अडकल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?