-
हा ड्रोनने टिपलेला फोटो आहे अलास्का येथे झालेल्या भूकंपानंतरचा. अमेरिकेतील अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीप परिसर १ डिसेंबर रोजी झालेल्या ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला ७ मैलावर होते. भूकंपाचा फटका हजारो नागरिकांना बसला आहे. या भूकंपानंतर भूकंपाचे केंद्र बिंदू असणाऱ्या एंकोरेज शहराच्या सभोवतालच्या परिसरातील इमारती, पूल कोसळले. रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, सुमारे ४० वेळा कंपनं जाणवली. या भूकंपानंतरच्या नुकसानाचे फोटो अनेकांनी ट्विटवरून शेअर केले आहेत. या पैकी अनेक फोटो हे एखाद्या अॅक्शन मुव्हीमधील दृष्यांसारखे वाटत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
-
भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला ७ मैलावर होते.
-
या भूकंपानंतर भूकंपाचे केंद्र बिंदू असणाऱ्या एंकोरेज शहराच्या सभोवतालच्या परिसरातील इमारती, पूल कोसळले. रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.
-
अनेकांनी रस्त्यांचे फोटो ट्विटवर शेअर केले आहेत
-
तुटलेल्या रस्त्यांवर अडकलेल्या गाड्या अनेक फोटोंमध्ये दिसत आहेत
-
रस्त्यांना काही फुट लांबीच्या अवाढव्य भेगा पडल्या आहेत.
-
आपत्कालीन सेवा परवणाऱ्यांनाही रस्त्यावर भेगा पडल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले.
-
या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, सुमारे ४० वेळा कंपनं जाणवली.
-
आपत्कालीन सेवावरही झाला परिणाम
-
भूकंपाची तिव्रता इतकी होती की चढ उतार असणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या भेगा पडल्या
-
भल्या मोठ्या भेगा पडलेल्या रस्त्यांवरून गाड्या बाहेर काढण्याचे आव्हान आता मदत यंत्रणांपुढे आहे.
-
अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल