-
सध्या गोवा आणि कोकण किनारपट्टीवर युद्धनौकांचा संचार वाढला आहे. नाही चिंतेचे काही कारण नाही कारण ही कोणत्या युद्धाची तयारी नसून भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचा एकत्रित सराव सुरु आहे. एक्सर्साइज कोकण २०१८ या नावाने हा संयुक्त युद्धसराव सुरु आहे. यामध्ये भारतीय आणि ब्रिटीश नौदलातील युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. पाहूयात यात युद्धनौकांच्या सरावाचा हा कोकण किनारपट्टीवरील थरार…
-
भारताची आयएनएस कोलकाता आणि ब्रिटीश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीमधील एचएमएस ड्रॅगन
-
या युद्ध सरावादरम्यान हॅलिकॉप्टरमधून युद्धनौकेवर उतरण्याचा सरावही करण्यात आला
-
गोव्याच्या किनारपट्टीजवळ भारताची आयएनएस कोलकाता आणि ब्रिटीश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीमधील एचएमएस ड्रॅगन या युद्धनौका सराव करताना.
-
यामध्ये दोन्ही देशांमधील सैनिकांनी एकत्रित युद्ध सराव केला
-
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच अनेक ब्रिटीश युद्धनौका गोवा तसेच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर यासाठी दाखल झाल्या. हा फोटो आहे ब्रिटीश नौदलातील एचएमएस ड्रॅगन या युद्धनौकेचा ही युद्धनौका २९ नोव्हेंबर रोजी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर पोहचली.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल