-
जगप्रसिद्ध खासगी टॅक्सीसेवा पुरवठादार कंपनी असणाऱ्या ओलाने इंग्लंडमधील लिव्हरपूल शहरामध्ये चक्क रिक्षांमधून ग्राहकांना मोफत सेवा देत आहे.
-
लिव्हरपूलमधील मेरीसाईड भागामध्ये ही मोफत सेवा पुरवण्यात येत आहे. रिक्षांना इंग्लंडमध्ये टूक-टूक व्हेइकल्स असं म्हणतात.
-
सध्या लिव्हरपूलमध्ये ५०० हून अधिक चालक ओलाची सेवा पुरवतात या चालकांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने ही रिक्षा मोहिम सुरु करण्यात आली आहे.
-
उबरला जागतिक पातळीवर आव्हान देणारी भारतीय कंपनी म्हणून ओलाकडे पाहिले जाते. म्हणूनच आपली जाहिरात करण्यासाठी ओलाने भारतात लोकप्रिय असणाऱ्या रिक्षा चक्क इंग्लंडमधील रस्त्यांवर उतरवल्या आहेत.
-
कंपनीचे युनायटेड किंग्डममधील कार्यकारी अध्यक्ष बेन लेग हे स्वत: अनेक प्रवाशांना या रिक्षांमधून मोफत फेरफटका मारून आणत होते. 'या फ्री राइडदरम्यान प्रवाश्यांशी गप्पा मारताना त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता आल्या,' असं बेन यांनी सांगितले.
-
ओलाची सर्वात मोठी स्पर्धक असणाऱ्या उबरपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन कंपनीने नव्या चालकांना दिले असून अनेक मोफत सुविधाही पुरवल्या जातील असंही कंपनीमार्फत सांगण्यात आले आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल