-
तरुण म्हणजे ऊर्जा, वेगळं काहीतरी करण्याची धडपड! विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या अशाच हरहुन्नरी तरुणाईचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तरुण तेजांकितच्या दुसऱ्या पर्वात प्रसिद्धीपासून दूर असलेल्या १४ तरुणांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आला. विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या तरुणाईचा सन्मान करणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. या उपक्रमांतर्गत प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या पण आपापल्या क्षेत्रात अथकपणे काम करणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुणाईला हेरून त्यांचा सन्मान करण्यात आला. या १४ गुणवंतांच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. सर्वसामान्यांमधून निवडलेल्या तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. विज्ञान, कला, कायदा, सामाजिक, साहित्य इत्यादी क्षेत्रांमधून तज्ज्ञ समितीने निवडलेल्या या कर्तबगार तरुणांचे कार्य जाणून घेण्यासाठी अनेक क्षेत्रांतील मान्यवरांमध्येही उत्सुकता होती. (सर्व फोटो: प्रशांत नाडकर)
-
प्रसिद्ध गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर या प्रमुख पाहुण्यांशी संवाद साधला. कला आणि विज्ञान यांचा सुंदर मिलाफ या संवादातून अनुभवता आला. त्यानंतर पं. कशाळकर यांनी गायलेल्या ‘राग वसंत’ने हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. ‘‘विज्ञान असो किंवा संगीत, स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्यासाठी ठरावीक कालावधीत घेतलेल्या पदवीपलीकडे तपश्चर्या करावी लागते. तोपर्यंत मिळालेले ज्ञान हे फक्त गुरूची आठवण ठरते. स्वतंत्र प्रतिभा निर्माण करण्याची क्षमता आजच्या तरुणांमध्ये नक्कीच आहे. प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम काम करणारे तरुण हे याचेच द्योतक आहेत,’’ असे गौरवोद्गार डॉ. काकोडकर आणि पं. कशाळकर यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सन्मान सोहळ्यात काढले. चला तर पाहुयात कोण ठरले आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचे’ मानकरी…
-
बहुआयामी गणितज्ज्ञ: अपूर्व खरे (संशोधन)
-
लक्ष्यवेधी सुवर्णकन्या: राही सरनोबत (क्रीडा)
-
तृतियुंथीयांची सखी: कृपाली बिडये (सामाजिक कार्य)
-
अस्थिरुग्णांचा तारणहार: निलय लाखकर (नवउद्यमी)
-
जनहितैषी वकील: युवराज नरवणकर (सामाजिक कार्य)
-
फॉरेन्सिक लेखा परीक्षक: अपूर्वा जोशी (नवउद्यमी)
-
बुहपेडी कलावंत: चिन्मय मांडलेकर (कला/मनोरंजन)
-
पथदर्शी संशोधक: रोहित देशमुख (नवउद्यमी)
-
सामान्यांचा न्यायमित्र: ऋषिकेश दातार (नवउद्यमी)
-
आश्वासक विज्ञानप्रसार: अनिकेत सुळे (सामाजिक कार्य)
-
संवेदनशील कलाकार: जितेंद्र जोशी (कला/मनोरंजन)
-
उपेक्षितांचा आश्रयदाता: विकास पाटील (सामाजिक कार्य)
-
प्रतिभावान ग्रँडमास्टर: विदित गुजराथी (क्रीडा)
-
चतुस्त्र अभिनेत्री: नंदिता पाटकर (कला/मनोरंजन)
-
‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील व शैलेश पाटील, ‘सारस्वत बँक’चे गौतम ठाकूर, ‘रुणवाल ग्रुप’चे संदीप रुणवाल, ‘सिडको’च्या प्रिया रातांबे, एम. के. घारे ज्वेलर्सचे उदय घारे, ‘लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे रवींद्र सुळे, ‘पीडब्ल्यूसी’चे सुभाष पाटील, ‘एमआयडीसी’चे पी. अनबलगन, ‘परांजपे स्कीम’चे अमित परांजपे तेजांकितांच्या कामाला दाद देण्यासाठी उपस्थित होते.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?