-
सन १९९९ नंतर भारताला धडकणारे सर्वाधिक घातक वादळ असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीला धडकले आहे. आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. भारतीय नौदलानेही मदत कार्यामध्ये सहभाग घेतला आहे. (सर्व फोटो: @indiannavy ट्विटर हॅण्डवरून साभार)
-
‘फॅनी’ चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या किनारी भागात मदत पोहचवण्यासाठी आयएनएस सह्याद्री १ मे रोजीच ओदिशाच्या समुद्रकिनारी पाठवली आहे.
-
आयएनएस सह्याद्री १ मे रोजीच ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने पाठवली तेव्हा नौदलाने ट्विट केलेला फोटो.
-
भारतीय नौदलाने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन काही फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी समुद्रात फॅनी चक्रीवादळ कसे दिसते यासंदर्भातील तीन फोटो पोस्ट केले आहेत. भारतीय नौदलाने ट्विट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये जहाजातील तळाच्या भागात समुद्राचे पाणी शिऱ्याचे दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोमध्ये मोठ्या लाटांमुळे जहाज कशाप्रकारे हेलकावे खात असल्याचे दिसत आहे.
-
तिसरा फोटोमध्ये जहाजाची दुसरी बाजू दाखवली असून लाटांमुळे जहाज स्थिर नसल्याचे हा फोटो पाहता क्षणीच दिसून येते.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ