-
पुणे मेट्रोच्या ३१ किमीच्या मार्गापैकी सुमारे ५ किमीचा मार्ग भुयारी आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानापासून मेट्रोच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम टनेल बोअरिंग मशिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात आले. याच कामाची ही झलक… (सर्व फोटो: पवन खेंग्रे)
-
टीबीएमने आत्तापर्यंत ७० मीटरचे खोदाईकाम पूर्ण केले आहे.
-
दुसऱ्या टीबीएमची जोडणी अंतिम टप्प्यात असून २८ डिसेंबरपासून हे मशिनही सुरू होणार आहे.
-
शहराच्या गजबजलेल्या भागांतून टीबीएमद्वारे बोगद्याच्या निर्मितीचे आव्हानात्मक काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे केले जात आहे.
-
पुढील महिन्यात स्वारगेटवरून आणखी दोन मशिनचे काम सुरू होणार आहे.
-
मेट्रो, पीएमपी, रीक्षा, दुचाकी वाहने अशा सगळ्यांनी एकमेकांना पूरक काम केले तरच पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न काही अंशी तरी सुटणार आहे.
-
पुण्याच्या मेट्रोला आधीच बराच उशीर झाला आहे. परंतु त्याचे काम सुरू झाल्यानंतर ज्या वेगाने ते पुढे चालले आहे, ते पाहून पुणेकरांची दहाही बोटे तोंडात गेली आहेत, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
पुणे मेट्रोच्या ३१ किमीच्या मार्गापैकी सुमारे ५ किमीचा मार्ग भुयारी आहे.
-
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानापासून मेट्रोच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम टनेल बोअरिंग मशिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात आले आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली