-
‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेताना वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नावही आवर्जून घेण्याचा नवा पायंडा पाहायला मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या १२ मंत्र्यांनी शपथ घेताना आईचेही नाव घेत ‘मातृ देवो भव’ची प्रचीती दिली. जाणून घेऊयात कोण कोणत्या नेत्यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.
-
महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शपथविधीतही तोच पायंडा पाहायला मिळाला. अनेक मंत्र्यांनी शपथ घेताना वडिलांबरोबरच आईचेही नाव घेत मातृदेवो भव.. ही उक्ती कृतीत आणली आणि आईविषयीचे ऋण व्यक्त केले. यात तिन्ही पक्षांच्या आमदारांचा समावेश होता.
-
मंत्रिपदाची शपथ घेताना आपले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे पूर्ण नाव घेऊन पुढील शपथ घेण्याची सर्वसाधारण रीत आहे. आतापर्यंतच्या मंत्रिमंडळ शपथविधीत त्याच पद्धतीने मंत्री शपथ घेत. यंदा विधानसभा निवडणुकीनंतर विधिमंडळ अधिवेशनात आमदारकीची शपथ घेताना अनेक आमदारांनी वडिलांबरोबरच आईचे नाव घेतले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनीही शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला. आदिती यांच्या आईचे नाव वरदा आहे.
-
-
शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांनी शपथ घेताना आईचे नाव घेतले.
-
‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशी शपथ आदित्य ठाकरे यांनी घेतली.
-
शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शपथ घेताना आईचे नाव घेतले.
-
विश्वजित कदम यांनी आपल्या मातोश्री विजयमाला यांच्या नावाचा शपथ घेताना उल्लेख केला.
-
काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले. त्यांच्या आईचे नाव ललिता गायकवाड आहे.
-
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आई शांतादेवी यांचे नाव शपथ घेताना घेतले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब पाटील यांनीही शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.
-
राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी आई लिलावती यांच्या नावाचा उल्लेख केला.
-
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आई सकिनाबेन मुश्रीफ यांचे नाव शपथ घेताना घेतले.

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…