हा फोटो नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्यातील आहे जम्मू काश्मीरला गेले असता नरेंद्र मोदींनी लडाखचाही दौरा केला होता. यावेळी त्यांनी तेथील पारंपारिक पोशाख परिधान केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींनी हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील दौऱ्यावेळी पारंपारिक टोपी घातली होती. हा फोटो नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात दर्शनाला गेले होते त्यावेळचा आहे -
नरेंद्र मोदींनी २०१९ मध्ये कझाकिस्तानचा दौरा केला होता. यावेळी ते पारंपारिक वेषात दिसले. पंजाबच्या दौऱ्यावर असतानाचा नरेंद्र मोदींचा फोटो डिस्कव्हरी चॅनेलच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड कार्यक्रमात नरेंद्र मोदी एकदम वेगळ्या अंदाजात दिसले तामिळनाडूमधील महाबलीपूरम येथील समुद्रकिनाऱ्यावर मोदींनी स्वच्छता केली होती. त्यांचा हा फोटो चांगलाच चर्चेत राहिला होता वर्षाच्या शेवटी सूर्यग्रहण पाहताना नरेंद्र मोदी लाल मफलर आणि जॅकेटमध्ये दिसले होते. सूर्यग्रहण पाहण्यासाठी त्यांनी घातलेल्या चश्म्याच्या किंमतीवरुन तसंच फोटोवरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी २०१९ हे वर्ष खूपच खास राहिलं. याचवर्षी ते दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना जनतेचं समर्थन मिळालं. नरेंद्र मोदी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून नेहमी आपले फोटो शेअर करत असतात. नरेंद्र मोदी ज्या देशात किंवा राज्यात दौऱ्यासाठी जातात तेथील पारंपारिक पोशाख परिधान करतात. नरेंद्र मोदींचे असेच काही २०१९ मधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव