-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत महामोर्चा निघणार आहे. आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरेंचा प्रवास आता हिंदुत्वाच्या दिशेने सुरु झाला आहे. ( सर्व फोटो – सोशल मीडिया)
-
राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे असून त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. राज ठाकरे यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले.
-
राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
-
व्यंगचित्रांबरोबर राज ठाकरेंना तबला, गिटार आणि व्हायोलिनही वाजवता येते. बालपणी त्यांनी ही वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले.
-
राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. मार्मिकच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
-
राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मिनाताई ठाकरे या सुद्धा सख्ख्या बहिणी आहेत.
-
राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर चांगले मित्र आहेत.
-
राज ठाकरे यांच्या मुलाचा अमितचा मागच्यावर्षी मिताली बोरुडे बरोबर विवाह झाला. त्या सुद्धा फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत.
-
व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे. राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे.
-
राज ठाकरे आज राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे काढली.
-
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा भाजपानेही धसका घेतला होता. म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर रेखाटलेल्या प्रत्येक व्यंगचित्राला भाजपा समर्थकही व्यंगचित्रातून उत्तर देत होते.
-
राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.
-
२००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
-
२००८ मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले.
-
आता राज यांनी पक्षाच्या झेंडयाचा रंग बदलला असून, हिंदुत्वाची वाटेवरुन एक नवा प्रवास सुरु केला आहे.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला