-
दिल्ली विधानसभा निवडणुकींमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने (आप) दमदार यश मिळवलं आहे. ७० पैकी ६३ जागांवर आपने विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज केली आहे.
-
'आप'च्या विकासाच्या प्रचाराला एकतर्फी कौल दिल्लीकरांनी दिला आहे. भाजपाला या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. भाजपाने सर्वशक्ती पणाला लावूनही केवळ सात जागांवर विजय मिळवता आला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन मोठ्या सभांबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. देशातील कोणत्याही राज्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी आणि शाह यांच्या सभांचे आवर्जून आयोजन केलं जातं. मोदी आणि शाह हे भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील प्रचारक आहेत.
-
वेगवेगळ्या राज्यांमधील भाजपाचे सहा आजी-माजी मुख्यमंत्री, नऊ केंद्रीय मंत्री, ४० हून अधिक स्टार प्रचारक आणि शंभरहून अधिक खासदारांनी दिल्ली निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार केला होता. तरीही या सर्वांवर अरविंद केजरीवाल भारी पडल्याचे चित्रच निकालांमधून स्पष्ट झालं आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर महिन्यामध्ये २२ तारखेला रामलीला मैदानात मोठी सभा घेतली होती. यामध्येच त्यांनी दिल्ली सरकारच्या कारभारावर टीका केली होती.
-
मोदींनी दुसरी सभा ४ फेब्रुवारी रोजी घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी “दिल्लीला दोष देणारे नव्हे, तर दिशा देणारे सरकार हवे आहे,” असं आवाहन मतदारांना केलं होतं.
-
अमित शाह यांनी दिल्ली निवडणुकीसाठी २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान १३ दिवस प्रचार केला. यामध्ये त्यांनी ५३ बैठका, आठ रोड शो घेतले. शाह यांनी सभा, बैठकांबरोबरच दारोदारी जाऊन प्रचार केला.
-
भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ५४ लहान मोठ्या सभा आणि आठ रोड शो घेतलो होते.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीदरम्यान दिल्लीमध्ये भाजपाचा प्रचार केला. यामध्ये त्यांनी १२ सभा घेतल्या.
-
दिल्ली भाजपाचे प्रमुख मनोज तिवारी यांनी दारोदारी जाऊन भाजपाचा प्रचार केला. त्यांनी पूर्वांचलमधून आलेल्या मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने ४० बैठका आणि सभा घेतल्या. दिल्लीमधील ३० ते ३२ टक्के मतदार हा पूर्वांचल राज्यांमधील आहे.
-
भाजपाचे नेते परवेश साहिब सिंग यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता.
-
अनुराग ठाकूर यांनी 'गोली मारो गद्दारो को' अशा वादग्रस्त घोषणा आपल्या भाषणात दिल्या होत्या. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती.
-
अरविंद केजरीवाल यांनी तीन मोठे रोड शो केले. तसेच केजरीवाल यांनी सभाऐवजी दारोदारी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला.
-
केजरीवाल यांच्या प्रचारापेक्षा भाजपाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच केजरीवाल सतत चर्चेत राहिले. त्याचाच त्यांना अप्रत्यक्षपणे फायदा झाला.
-
केजरीवाल यांच्या खालोखाल आपचे दुसरे प्रमुख नेते असणाऱ्या मनिष सिसोदिया यांनाही दारोदारी जाऊन प्रचार केला. तुमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आपला मत द्या असं आवाहन सिसोदिया यांनी मतदारांना केलं होतं.
-
काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी एकूण चार सभा घेतल्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या दोघांनी काँग्रेससाठी मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं.
-
राहुल आणि प्रियंका यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा वाचताना 'शिला वाली दिल्ली' ही टॅगलाईन घेत प्रचार केला.
-
नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री
-
देवेंद्र फडणवीस – राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीमध्ये भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.
-
चंद्रकांत पाटील – फडणवीसांबरोबरच महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनाही दिल्लीमध्ये दारोदारी जाऊन भाजपासाठी प्रचार केला. महाराष्ट्रातील भाजपाच्या इतर काही नेत्यांनाही भाजपासाठी दिल्लीत प्रचार केला होता.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या