-
तुम्ही कंप्युटरवर काम करताना किंवा अगदी व्हॉट्सअॅपवर चॅट करतानाही cut-copy-paste हे पर्याय वापरता ना? अर्थात वापरतच असाल. कारण या तीन पर्यायांशिवाय कंप्युटरवर काम करणं शक्य नाही. आपल्यापैकी तर अनेकजण ऑफिसमध्ये दिवसातून शेकडो वेळा cut copy paste या पर्यायाचा वापर करत असतील.
-
कंप्युटर वापरणे सोप्प व्हावं म्हणून १९७० च्या दशकात लॅरी टेसलर यांनी cut-copy-paste चा पर्याय शोधून काढला. आज याच लॅरी यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी लॅरी यांचं निधन झालं.
-
१९४५ साली न्यू यॉर्कमध्ये लॅरी यांचा जन्म झाला. त्यांनी स्टॅण्डफोर्ड येथे कंप्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी काही काळ आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयवर संशोधन केलं.
-
१९७३ साली कंप्युटर श्रेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या अॅलन के यांनी लॅरी यांना झेरॉक्स कंपनीच्या पॅलो ऑल्टो रिसर्च सेंटर (पीएआरसी) येथे नोकरीची संधी दिली.
-
पीएआरसीमध्येच लॅरी यांनी cut copy paste तंत्रज्ञानाचा शोध लावला. माहिती पुन्हा पुन्हा लिहिण्याऐवजी अगदी काही क्षणांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी हा पर्याय लॅरी यांनी शोधून काढला.
-
वापरण्यास सोप्पा असणारा cut copy paste चा हा पर्याय नंतर कंप्युटींगचा अविभाज्य भाग बनला. आज तर कंप्युटरबरोबरच स्मार्टफोनमध्येही हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
-
ग्राफिक युझर इंटरफेस आणि माऊसच्या हलचालींसंदर्भातील संशोधन आणि अभ्यासाठी पीएआरचे नाव घेतले जायचे. या अनेक संकल्पनाच्या मागे लॅरी यांचीच मेहनत आहे.
-
१९७९ साली झेरॉक्समध्ये काम करत असतानाच लॅरी अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्याबरोबर दिसू लागले. झेरॉक्समध्ये लॅरी करत असलेले काम पाहून स्टीव्ह यांनी लिसा आणि मॅक हे प्रोडक्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
-
झेरॉक्समध्ये सुरु असणाऱ्या कामापासून प्रेरणा घेऊन स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांनी काय करामत करुन दाखवली हे सर्वांना ठाऊक आहे.
-
झेरॉक्समध्ये लॅरी यांनी केलेल्या कामामुळेच आज आपल्याला मॅक कंप्युटर आणि साध्या कंप्युटर्समधील अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान वापरता येत आहे.
-
लॅरी यांनी शोधलेलं cut copy paste हे तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यामागे मॅकेंतोश आणि लिसा या कंप्युटींग सिस्टीम्सचा मोठा वाटा होता.
-
१९८० मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी लॅरी यांना अॅपलमध्ये नोकरी दिली. अॅपलच्या मॅकेंतोशमधील क्वीक टाइम, अॅपल स्क्रीप्ट आणि अॅटकिनसन्स आयपर कार्डसारख्या संकल्पनांमध्ये लीसा यांनी महत्वाचे योगदान दिल्याचे अॅपलशी संबंधित लोक सांगतात.
-
लॅरी हे मॉडललेस कंप्युटींगसाठीही प्रसिद्ध होते. यासंदर्भात त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे.
-
लॅरी यांनी १९९७ साली अॅपल कंपनी सोडली. त्यानंतर त्यांनी स्टेजकास्ट या स्टार्टअप कंपनीमध्ये काम केलं.
-
१९९७ साली लॅरी यांनी पॅलो अॅल्टो येथे स्टेजकास्ट सॉफ्टवेअरची स्थापना केली होती.
-
१९९९ मध्ये स्टेजकास्ट क्रिएटर लॅरी यांनी जगासमोर आणला.
-
कोकाआ ही नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज निर्माण करण्याच्या कामातही लॅरी यांचा सहभाग होता. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ही खास प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली जात होती.
-
२००१ साली लॅरी यांनी अॅमेझॉन कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. ते इंजिनियरिंग विभागाचे उपाध्यक्ष होते.
-
अॅमेझॉनला त्यांच्या वेबसाईटमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी लॅरी यांनी मदत केली.
-
२००५ साली लॅरी यांनी अॅमेझॉनमधील नोकरी सोडली आणि ते याहूमध्ये गेले. तेथे त्यांनी २००९ पर्यंत नोकरी केली.

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल