-
जगातल्या सर्वात सुरक्षित कार्समध्ये या डोनाल्ड ट्रम्प यांच्या द बीस्ट या कारची गणना केली जाते. या कारची किंमत ११ कोटींच्या वर आहे
-
डोनाल्ड ट्रम्प यांची कार म्हणजे एक ‘जानदार सवारी’ आहे. डॉर्क ब्लॅक कलर, दमदार इंजिन आणि लिमोझीन कारसारखं डिझाईन ही कारची मुख्य वैशिष्ट्यं आहेत.
-
बॉम्बस्फोट, रॉकेट लाँचरचा हल्ला सहन करुनही अभेद्य राहणारी डोनाल्ड ट्रम्प यांची ही Cadillac Beast कार आहे.The Beast असं त्यांच्या कारचं नाव आहे.
-
ट्रम्प यांच्या कारची निर्मिती Cadillac ने केली आहे. अमेरिकेतील जनरल मोटर्स कंपनीचा हा एक भाग आहे.
-
ही एक अभेद्य कार आहे बॉम्बस्फोट असो किंवा रॉकेट हल्ला ही कार अभेद्य राहते.
-
या कारच्या खिडक्या खास पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या आहेत. पॉलीकॉर्बोनेट आणि ग्लॉसचे पाच लेअर या कारच्या खिडकीला देण्यात आले आहेत. त्यामुळे या कारच्या खिडक्या कोणत्याही ऑटोमेटिक हत्यारातून चाललेल्या गोळ्यांचा मारा सहन करु शकते.
-
कारच्या आतमध्ये संकटकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पंप अॅक्शन शॉट गन, टीअर गॅस कॅनन, राष्ट्राध्यक्षांसाठी ब्लड बॅग, फायर फायटिंग सिस्टिम, स्मोक स्क्रीन डिस्पेंन्ससर यांचीही व्यवस्था आहे.
-
या कारच्या चालकाला खास प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एवढंच नाही तर कोणतेही नुकसान न होता १८० डिग्रीमध्ये ही कार फिरवता येते
-
या कारमध्ये नाईट व्हिजन कॅमरेचीही सोय आहे. या कारचे टायर कधीही पंक्चर होत नाही. जर स्फोट झाला तर टायर फाटतील पण तरीही त्यांचं काम सुरु राहिल अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”