-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्याची देशभरात चर्चा आहे. सोशल नेटवर्किंगवर रविवार संध्याकाळपासूनच ट्रम्प यांच्या आगमनाविषयी ट्रेण्ड व्हायरल होताना दिसले. #TrumpIndiaVisit, #TrumpInIndia, #IndiaWelcomesTrump आणि #Ahmedabad हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसले. मात्र त्याच वेळी नेटकऱ्यांची ट्रम्प यांच्याबद्दलची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटवर ट्रम्प यांची पत्नी, मुलगी कोण आहे यासंदर्भात अनेकांनी सर्च केल्याचे दिसत आहे. जाणून घेऊयात भारतीयांनी ट्रम्प यांच्याबद्दल नक्की काय सर्च केलं आहे आणि त्याची उत्तरे काय आहेत.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव काय आहे?
-
ट्रम्प यांच्या मुलीचे नाव इवांका ट्रम्प आहे. इवांकाही ट्रम्प यांच्याबरोबर भारत दौऱ्यावर येत आहे. इवांकाबरोबरच तिचा पती जेरेड कुशनरही भारताच्या दौऱ्यावर ट्रम्प कुटुंबाची सोबत करणार आहे.
-
इवांका ही ट्रम्प प्रशासनाची सल्लागार म्हणून काम पाहते. इवांका याआधी २०१७ मध्ये भारतात आली होती. त्यावेळेस तिने हैदराबादमधील आंत्रप्रेन्युअरशिप समिटमध्ये सहभागी झाली होती.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव काय आहे?
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव मेलेनिया ट्रम्प आहे. मेलेनिया ही ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहे.
-
मेलेनिया यांचा जन्म १९७० मध्ये स्लोवेनियामध्ये झाला. त्या एक प्रोफेश्नल मॉडेल होत्या. ट्रम्प आणि मेलेनिया यांनी २००५ साली लग्न केलं.
-
इवांकाचे वय किती आहे?
-
इवांका ट्रम्पचा जन्म ३० ऑक्टोबर १९८१ साली झाला. इवांका या ३९ वर्षांच्या आहेत.
-
इवांका यांच्या पतीचे नाव जेरेड कुशनर असे आहे. जेरेड आणि इवांकाने २००९ साली लग्न केलं.
-
POTUS म्हणजे काय?
-
POTUS (पोटस) म्हणजेच 'प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स' म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे.
-
मेलेनियाचे वय किती आहे?
-
मेलेनिया यांचे वय ५० वर्ष आहे. मेलेनिया यांचा जन्म १९७० साली झाला आहे. त्या सध्या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आहेत.
-
डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती आहे?
-

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक