-
शिवसेनेकडून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २६ मार्चला महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागा रिक्त होणार आहेत. (फोटो सौजन्य : प्रियंका चतुर्वेदी यांच्या फेसबुक पेजवरून)
-
एप्रिल २०१९ मध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवेसेनेकडून त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.
-
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरै, दिवाकर रावते यांची नावं शिवसेनेकडून उमेदवारीसाठी चर्चेत होती. परंतु प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव शिवसेनेनं जाहीर केलं.
-
काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली, परंतु या गंभीर प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.
-
लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती, पण तिकीट न दिल्याने मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.
-
पक्षप्रवेशानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते.
-
दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. सर्वसमावेशक, मुक्त व पुरोगामी अशा काँग्रेसच्या आदर्शांवर माझा विश्वास होता, असं त्या म्हणाल्या होत्या.
-
शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांनी अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडली.
-
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि प्रियंका चुतुर्वेदी यांच्याच ट्विटयुद्ध रंगंल होतं.
-
मेट्रोसाठी आरेमध्ये वृक्षतोड होत असताना वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या होत्या.
-
आता त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली असून संख्याबळानुसार महाविकासआघाडीचे चार तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ