-
देशभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचे महाराष्ट्रातही रुग्ण आढळल्यामुळे सरकारने गंभीर पावलं टाकायला सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारपासून मुंबई शहर उद्यापासून अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)
-
संग्रहित छायाचित्र
-
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात नेहमी गर्दी पहायला मिळते. मात्र करोनामुळे या ठिकाणीही फारशी लोकं फिरताना दिसत नाहीयेत. करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये याकरता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
-
शहरातील दुकानं आता अंतरा-अंतराने (सकाळी-दुपारी) सुरु राहतील. बाजारातील गर्दी आणि रहदारीच्या रस्त्यांनाही पर्यायी व्यवस्था पुरवण्यात येईल.
-
अन्न-औषधं, जीवनावश्यक वस्तू यांचा साठा करु नये असे आदेशही देण्यात आले आहेत. राज्यातील नागरिकांना घाबरुन जाण्याची काहीच गरज नसल्याचंही सरकाने आज स्पष्ट केलं.
-
ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यासाठी सांगितलं आहे, त्यांनी स्वतः घरी राहून इतरांचीही काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी प्रवास करणं टाळा अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.
-
शासकीय कार्यालयात दिवसाआड ५० टक्के उपस्थिती, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कमी क्षमतेने चालवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यावर उपाय म्हणून बेस्ट मध्ये उभ्याने प्रवास करणं तात्पुरतं बंद करण्यात आलेलं आहे.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS