-
करोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यामध्ये करोनाचे ४२ रुग्ण अढळून आले असले तरी मुंबईमधील गर्दी म्हणावी तितकीशी कमी झालेली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. अशातच मुंबईसारख्या शहरांमध्ये बनावट आणि स्वस्तामध्ये कमी दर्जाचे मास्क विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक रेल्वे स्थानकांबाहेर मास्क विकणारे दिसून येत आहे. मुंबईकरांनी मिळेल त्या मास्क तोंडावर चढवण्यास सुरुवात केली आहे. या मास्कधारी मुंबईचे फोटो आपल्या कॅमेरात टीपले आहेत एक्सप्रेसचे फोटोग्राफर प्रशांत नाडकर यांनी.
-
अनेक मुंबईकर मास्क घालूनच बाहेर पडताना दिसत आहे.
-
कर्मचारी वर्गही मोठ्याप्रमाणात मास्कचा वापर करताना दिसत आहे.
-
ऑन ड्युटी पोलिसही मास्क घालूनच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.
-
महिला वर्गाने मास्कऐवजी स्कार्फचा आधार घेतल्याचे चित्र दिसत आहे.
-
वेगवेगळ्या प्रकारचे मास्क घातलेले नागरिक मुंबईमध्ये दिसत आहेत.
-
काहींनी मास्कचा तर काहींनी रुमालाचा आधार घेतला आहे.
-
मुंबईतील टॅक्सीचालकांनीही करोनाचा धसका घेतला असून ते मास्क किंवा रुमाल बांधून असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
-
मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर अगदी दहा रुपयांपासून ते काही शे रुपयांपर्यंत मास्कची विक्री केली जात आहे. मात्र या मास्करचा दर्जा काय, ते किती उपयोगी आहेत याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये जागृकता दिसून येत नाही.
-
असं असलं तरी मास्क घालून फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.
-
मुंबई सीएसएमटी स्थानकामध्येही मास्क घालतेल्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
-
सीएसएमटी स्थानकामध्ये मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
-
सीएसएमटी स्थानकात प्रवाशांच्या शरिराचे तापमान तपासले जात आहे.
-
शरिराचे तापमान तपासण्याच्या या सोयीचा अनेकजण लाभ घेताना दिसत आहेत.
-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपल्या शऱिराचे तापमान तपासून घेत आहे.
-
या डेस्कवरील प्रवाशांची संख्या हळू हळू वाढत आहे.
-
तापमान मोजणारा डेस्क, मास्क घातलेले प्रवाशी असे एकंदरित सीएसएमटी स्थानकातील चित्र दिसत आहे.
-
सीएसएमटी स्थानकातील वेटींग रुममधील हे दृष्य.
-
सीएसएमटी स्थानकातील गर्दी लक्षात घेता रेल्वेने प्रवास न करणारे पण रेल्वे स्थानक परिसरात काम करणारे कर्मचारीही काळजी घेताना दिसत आहेत. सीएसएमटी परिसरामध्ये मास्क घालून फिरणाऱ्यांची संख्या बरीच आहे.
-
सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्यावर दुपारी असा शुकशुकाट असतो.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS